केस गळतीवर उपयुक्त पपईचा मास्क, जाणून घ्या पपई केसांसाठी का आहे फायदेशीर

केस गळतीवर उपयुक्त पपईचा मास्क, जाणून घ्या पपई केसांसाठी का आहे फायदेशीर

अलीकडे तरुण वयोगटातील मुलींमध्ये केसगळतीचे प्रमाण खूपच वाढताना दिसत आहे. नवनवीन हेअर स्टाइल करून तसेच रासायनिक प्रक्रियेमुळे तरुणींमध्ये केसगळतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पपईचे आपल्या आहाराच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. तसेच पपई मास्क आपण त्वचेवर सुद्धा लावू शकतो. पपईपासून आपण केवळ फेस पॅक बनवू शकत नाही तर त्यामधून केसांचा मास्क सुद्धा बनवता येईल. पपई हेअर मास्कमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कोरड्या निर्जीव केसांसाठी हे खूपच फायदेशीर आहे.
पपईचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेत. हे आपल्या त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन ए आणि सी समृद्ध आहे. ते पौष्टिक फायद्यासाठी ओळखले जातात. आपण पपईपासून फेस पॅकच तयार करू शकत नाही तर त्यापासून केसांसाठी मास्क सुद्धा तयार करू शकतो. पपई हेअर मास्कमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. कोरड्या निर्जीव केसांसाठी हे फायदेशीर आहे.
नारळाचे तेल आणि पपई – पपईचे काही ताजे तुकडे ब्लेंडरमध्ये ठेवा आणि पपईचा लगदा तयार करा. एका भांड्यात 2 चमचे पपईचा लगदा घ्या आणि त्यात समान प्रमाणात नारळ तेल मिसळा. यासह आपल्या केसांवर लावावे, आणि चांगली मालिश करावी. पपईच्या केसांचा मास्क सुमारे एक तासासाठी तसेच ठेवावे. त्यानंतर सौम्य शैम्पूने केस धुवावे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा याची पुनरावृत्ती करावी.

दही पपई मास्क – पपईचा लगदा करण्यासाठी काही पपईचे चौकोनी तुकडे घ्यावेत. त्यानंतर या लगद्यापासून रस काढावा. त्यातील 2 चमचे पपईचा रस घ्यावा. त्यात 2 चमचे दही घाला. हे पपई हेअर मास्क केसांवर लावावे. हलक्या हाताने हळूवारपणे मालिश करा. आपले केस शॉवर कॅपने किमान 30 ते 40 मिनिटे तसेच झाकून ठेवावे. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावे. हा मास्क आठवड्यात किमान एकदा केसांना लावावा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्यावा.)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात...
माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
महिलांची फक्त पूजा करू नका! दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे प्रतिपादन
लग्नाचे वचन मोडले म्हणजे बलात्कार नाही – सर्वोच्च न्यायालय
‘जंगलाचा राजा’ गुजरातमध्ये असुरक्षित; अवघ्या दोन वर्षांत 286 सिंहांचा धक्कादायक मृत्यू
सोन्याची तस्करी करताना कन्नड अभिनेत्रीला अटक
अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती