वडील DGP, लेक अभिनेत्री; चुकीची संगत अन् 15 किलो सोन्याची तस्करी केली, बंगळुरू विमानतळावरून अटक

वडील DGP, लेक अभिनेत्री; चुकीची संगत अन् 15 किलो सोन्याची तस्करी केली, बंगळुरू विमानतळावरून अटक

दक्षिणेकडील प्रसिद्ध अभिनेत्री रान्या राव (वय – 32) हिला सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तिच्याकडून तब्बल 14.8 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. बाजारात या सोन्याची किंमत जवळपास 12 कोटी रुपये आहे.

रान्या राव ही दुबईहून सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती राजस्व आसूचना निदेशालय अर्थात डायरेक्टोरेट ऑफ रेव्हिन्यू इंटेलिजन्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. तेव्हापासून डीआरआयचे अधिकारी रान्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन होते. 3 मार्च रोजी ती दुबईहून बंगळुरूच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली असता अधिकाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. याविळे कपड्यांच्या आतील भागांमध्ये सोनं लपवण्याचे आढळून आले.

डीआरआय अधिकाऱ्यांनी रान्याला ताब्यात घेतले असून तिच्याकडून 14.8 किलो सोनेही जप्त केले आहे. बाजारात या सोन्याची किंमत 12 कोटी रुपयांहून अधिक आहे. रान्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

वडील पोलीस महासंचालक

रान्या राव ही कर्नाटकचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे. रान्याच्या आईने रामचंद्र राव यांच्याशी दुसरे लग्न केले होते. वडिलांच्या नावाचा आणि पदाचा फायदा घेत रान्याने सोन्याची तस्करी सुरू केली होती, अशी चर्चा आहे. एवढेच नाही तर तिने डीआरआयच्या अधिकाऱ्यांना वडिलांच्या नावाने धमकी देण्याचाही प्रयत्न केला. मात्र अधिकाऱ्यांनी कशाचीही तमा न बाळगता रान्याला बेड्या ठोकल्या.

लेक अभिनेत्री

रान्या राव हिने काही वर्षांपूर्वी कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. 2014 मध्ये आलेल्या ‘माणिक्य’ हा तिचा सुपरहिट चित्रपट होता. या चित्रपटातच ती कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपसोबत झळकली होती, या चित्रपटामुळे तिला चांगली प्रसिद्धीही मिळाली. मात्र पुढे तिला अभिनयात काही खास करता आले नाही. त्यामुळे तिने पैसे कमावण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग निवडला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर स्वारगेट बलात्कार प्रकरण – पोलीस गणवेशात आरोपी गाडेचा होता एसटी स्थानकात वावर
शहरातील मध्यवर्ती स्वारगेट एसटी स्थानकात तरुणीला धमकावून बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात...
माझ्याकडून लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार नाहीत; प्रशांत किशोर यांचं भाकीत
महिलांची फक्त पूजा करू नका! दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे प्रतिपादन
लग्नाचे वचन मोडले म्हणजे बलात्कार नाही – सर्वोच्च न्यायालय
‘जंगलाचा राजा’ गुजरातमध्ये असुरक्षित; अवघ्या दोन वर्षांत 286 सिंहांचा धक्कादायक मृत्यू
सोन्याची तस्करी करताना कन्नड अभिनेत्रीला अटक
अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती