म्हणून ‘या’ मराठी कलाकाराने नाकारली “छावा” चित्रपटातील ती भूमिका; Video होतोय प्रचंड व्हायरल
छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या “छावा” चित्रपटाची चांगली घोडदौड सुरू आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धूमाकूळ घातला असून रग्गडल कमाई केली आहे. अवघ्या 2 आठवड्यांच्या आतच या चित्रपटाने 200 कोटींचा टप्पाही पार केला असून प्रेक्षकांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक केलं जात आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकराही महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. त्यामध्ये नीलकांती पाटेकर, संतोष जुवेकर, किरण करमरकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे यांच्यासह अनेक मराठमोळ्या कलाकारांचाही समावेश आहे.
त्यांच्या कामाचंही बरंच कौतुक होत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे देखील मराठ मोळेच आहेत. या चित्रपटात आणखी एका मोठ्या मराठी अभिनेत्यालाही भूमिका ऑफर करण्यात आली होती. मात्र त्या अभिनेत्याने ते पात्र साकारण्यास थेट नकार दिला. पण आपण असं का केलं याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं असून त्यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ते कलाकार म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे.
म्हणून नाकारली “छावा”तील ती भूमिका
‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘सुवासिनीची सत्व परीक्षा’, ‘दुहेरी’, ‘छत्रीवाली, ‘काकण’ यांसारख्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. अलिकडेच अशोक शिंदे झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेमुळे चर्चेत आले होते. काही महिन्यांपू्र्वी अशोक शिंदे यांनी एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती, तोच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या मुलाखतीदरम्यान त्यांनी मराठी कलाकारांना मिळणाऱ्या हिंदी सिनेमांच्या ऑफर, मालिकाविश्वातील पैसे आणि त्यांनी ‘छावा’ सिनेमाला दिलेला नकार याबद्दल स्पष्टपणे सांगितलं. बहुचर्चित ‘छावा’ चित्रपटात काम करण्यास नकार का दिला? यामागचं कारण त्यांनी सांगितलं.
मराठी प्रेक्षकांचे एवढे सारे प्रेम मिळत असताना बॉलिवुडमध्ये कमी दर्जाची भूमिका का साकारावी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले ” लक्ष्मण उतेकर माझे चांगले मित्र आहेत. आज तो खूप मोठा माणूस आहे. त्यांनी मला ‘छावा’ सिनेमातील भूमिकेसाठी विचारलं.पण सारं काही तिच्यासाठी या साठ माझं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यावेळेला मला लक्ष्मण यांनी एक रोल ऑफर केला. मला म्हणाले, असा-असा रोल आहे. त्या रोलसाठी त्यांनी माझं समोर पोस्टर लावलं होतं. त्या पोस्टर्समध्ये अनिल कपूर होते. ते औरंजेबाची भूमिका साकारणार होते. विकी कौशल संभाजी महाराजांची भूमिका करणार होता. रश्मिका मंदाना होती. अशा सगळ्या कलाकारांचे फोटो लावलेले होते,” अशी माहिती अशोक शिंदे यांनी दिली.
मी त्यांना विचारलं की लक्ष्मणराव हा चित्रपट मी करावा? त्यावर ते म्हणाले की माझी इच्छा आहे म्हणून काम कर. गेस्ट अपिअरन्स असेल तर आपण समजून शकतो. पण मी ती भूमिका का करावी असा प्रश्न मला पडला होता. मग ते म्हणाले की त्याला काय हरकत आहे. मग मी त्यांना सांगितलं की माझे 13 कोटी प्रेक्षक आहेत. माझं बॅगेज आहे, या प्रेक्षकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे, असं मी त्यांना सांगितलं, असं सांगत अशोक शिंदेंनी ती भूमिका नाकारण्यामागचं कारण सांगितलं.
तो अन्याय झाला असता..
उतेकर यांनी ऑफर केलेला रोल हा नकारात्मक होता. ते पात्र संभाजी महाराजांबद्दल माहिती देतं आणि नंतर त्यावा हत्तीच्या पायदळी देण्यात येतं असं ते पात्र होतं. मग मी त्यांना सांगितलं की नाराज होऊ नका. मी माझ्या मतांवर ठाम राहिलो. मला ते योग्य वाटलं नाही. मराठी प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं वाटलं,म्हणून मी नकार दिला, असं ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List