अभिनेत्याचे 300 पेक्षा जास्त अफेअर्स, 50 व्या वर्षी मुस्लीम अभिनेत्रीसोबत तिसरं लग्न, चौथ्या लग्नाबद्दल ‘तो’ म्हणाला…
बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख तयार केली. पण वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकल्यानंतर त्यांच्या चर्चा सर्वत्र रंगल्या. अशात अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अभिनेता संजय दत्त… संजूबाबाने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण वादग्रस्त प्रकरणांमध्ये अभिनेत्याचं नाव समोर आल्यानंतर संजय याला अनेक वर्ष तुरुंगवास देखील भोगावा लागला. शिवाय अभिनेत्याची लव्हलाईफ देखील चर्चेत राहीली.
एका मुलाखतीत खुद्द संजय दत्त याने धक्कादायक खुलासा केला होती. 300 पेक्षा जास्त मुलींसोबत संबंध असल्याची कबुली अभिनेत्याने दिली. संजूबाबा आता तिसरी पत्नी मान्यता दत्त हिच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेता रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिला.
संजूबाबाच्या पहिल्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने पहिलं लग्न 1978 मध्ये रिचा शर्मा हिच्यासोबत केलं. दोघांना एका मुलगी देखील आहे. लग्ननंतर रिचा हिने अभिनयाचा निरोप घेतला. लग्नाच्या काही वर्षांनंतर रिचा हिला ब्रेन ट्यूमर असल्याचं निदान झालं. त्यामुळे रिचा उपचारासाठी अमेरिकेत गेली. पण रिया या गंभीर आजारातून बाहेर आली नाही.
पहिल्या पत्नीच्या लग्नानंतर अभिनेत्याने दुसरं लग्न मॉडेल रिया पिल्लई हिच्यासोबत केलं. संजय आणि रिया यांची लव्हस्टोरी सुरु होती तेव्हा अभिनेता तुरुंगात होता. कठीण काळात रियाने संजय दत्तची साथ सोडली नाही. त्यामुळे अभिनेत्याच्या मनात तिच्याबद्दल प्रेम जागृत झालं आणि त्यानंतर अभिनेत्याने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रियाला प्रपोज केलं आणि दोघांनी 1998 मध्ये लग्न केलं. मात्र, सिनेमांमुळे संजयला रियाला जास्त वेळ देता आला नाही. म्हणून दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
दुसऱ्या घटस्फोटानंतर संजूबाबाच्या आयुष्यात मुस्लीम अभिनेत्रीची एन्ट्री झाली. ती अभिनेत्री म्हणजे मान्यता दत्त. संजूबाबा वयाच्या 50 व्या मान्यता हिच्यासोबत तिसरं लग्न केलं. दोघांना एका मुलगा आणि एक मुलगी आहे. संजूबाबा त्याच्या तिसऱ्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
चौथ्या लग्नाबद्दल काय म्हणाला अभिनेता?
एका मुलाखतीत संजूबाबा याला कोणत्या अभिनेत्रीसोबत लग्न करायला आवडेल असा प्रश्न विचारला… यावर अभिनेता म्हणाला, ‘मला माधुरी दीक्षित हिच्यासोबत लग्न करायला आवडेल…’ सांगायचं झालं तर, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List