Arvind Kejriwal Rajya Sabha entry – नव्या इनिंगसाठी अरविंद केजरीवाल सज्ज, पंजाबमार्गे राज्यसभेत जाण्याची तयारी

Arvind Kejriwal Rajya Sabha entry – नव्या इनिंगसाठी अरविंद केजरीवाल सज्ज, पंजाबमार्गे राज्यसभेत जाण्याची तयारी

दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा दारूण पराभव स्वीकारावा लागला. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही नवी दिल्ली मतदारसंघातून पराभवाचा धक्का बसला. तेव्हापासून केजरीवाल यांनी माध्यमांपासून अंतर राखले आहे. त्यांची पुढील रणनीती काय असे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच अरविंद केजरीवाल नव्या इनिंगसाठी सज्ज झाले असून ते पंजाबमार्गे राज्यसभेत जाण्याची तयारी करत असल्याची चर्चा सुरू झाली.

पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. येथून आम आदमी पार्टीने राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली आहे. संजीव अरोरा यांच्या जागी राज्यसभेवर अरविंद केजरीवाल यांची वर्णी लावली जात असल्याची चर्चा सुरू झाली.

राष्ट्रीय राजकारणामध्ये आपचे बळ वाढवण्यासाठी आणि पंजाब व दिल्लीचे मुद्दे उपस्थित करून मोदी सरकारला वरच्या सदनामध्ये घेरण्यासाठी केजरीवाल राज्यसभेत जातील अशी शक्यता होती. सुरुवातीला अरविंद केजरीवाल हे संजीव अरोरा यांच्या रिक्त जागेवरून राज्यसभेत जातील असा कयास होता. मात्र आता आपने याबाबत स्पष्टीकरण दिले असून केजरीवाल राज्यसभेत जाणार नाही हे स्पष्ट केले आहे.

भाजप आतून बाहेरून दाखवणार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शीशमहाल, केजरीवाल यांची अडचण वाढण्याची शक्यता

दरम्यान, निवडणूक आयोगाने अद्याप लुधियाना पश्चिमच्या पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्याचवेळी पंजाबमधील पोटनिवडणूकही घेतली जाईल, अशी शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका? सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याने साकारली होती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका?
छत्रपती संभाजीराजे यांची शौर्यगाथा सांगणारा चित्रपट ‘छावा’ हा सध्या सर्वत्र धुमाकूळ घालतोय. प्रत्येकाच्या ओठांवर फक्त छावाचच नाव आहे. छावा चित्रपट...
Pumkin Seeds Benefits: सकाळी रिकाम्यापोटी ‘या’ बिया खाल्ल्यामुळे आरोग्याला होतील अनेक फायदे…
Herbal Tea Benefits: घरच्या घरी ‘हे’ हर्बल टी ट्राय केल्यास Period Craps होतील दूर…
महायुतीत चाललंय काय? मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी
Blume Ventures Report – गरिबांची गरिबी जाईना, मध्यमवर्गीयांचे खिसे रिकामे मात्र, श्रीमंतांच्या तिजोऱ्या खचाखच; काय सांगतो अहवाल? वाचा…
पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
रात्री जेवणानंतर तुम्ही फळे खाताय का! फळे खाताना काही गोष्टी लक्षात ठेवा.. वाचा कोणत्या?