कॉमेडी शो, अभद्र टिप्पणी… रागात आमिर खान म्हणाला, ‘असे विनोद करण्यासाठी मी 14 वर्षांचा नाही आणि…’
समय रैना याच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ नुकताच झालेल्या एका भागात युट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वी मखीजा हिच्यासोबत अन्य लोकं देखील उपस्थित होते. पण शोमध्ये आई – वडिलांबद्दल अभद्र शब्दांचा उल्लेथ करण्यात आला. सांगायचं झालं तर, हा पहिला शो नाही ज्यामध्ये वाईट शब्दांचा वापर केल्यामुळे शो आणि कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले. याआधी 2015 मध्ये एक शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ज्यावर अभिनेता आमिर खान याने वादग्रस्त वक्तव्य केलं.
सध्या ज्या शोबद्दल चर्चा रंगल आहे, त्या शोचं नाव ‘AIB’ असं होतं. 2015 मध्ये शोच्या एका एपिसोडमध्ये करण जोहर आणि अनेक कॉमेडियनने अभिनेता रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यावर विनोद केले होते. दोघांची गर्लफ्रेंड, आकर्षक करियर शिवाय त्यांच्या लैंगिकतेवरही कमेंट्स केल्या होत्या. या कमेंट्स ऐकून लोकं आश्चर्यचकित झाले होते.
या प्रकरणानंतर अनेक तक्रारी दाखल झाल्या. धमक्या दिल्या होत्या. युट्युबवरून व्हिडिओही काढून टाकण्यात आले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप लोकांनी केला. तेव्हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेकांनी विरोध देखील केला.
दरम्यान, एका अभिनेत्याने केलेली टीका तुफान चर्चेत आली. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता आमिर खान आहे. ’25 शिव्या देऊन तुम्हाला वाटत असेल मी आनंदी आणि इंप्रेस होईल. तर शिव्यांमुळे इंप्रेस होण्याचं माझं वय निघून गेलं आहे. आता मी 14 वर्षांचा राहिलेलो नाही, जो शिव्या ऐकून हाहाहा हसेल…’
‘मला हसवायचं असेल तर, कोणाचं नाव न घेता… कोणाच्या भावना न दुखवता मला आनंदी करा. जर तुम्ही एखाद्याच्या रंगावर भाष्य केलं किंवा कोणाच्या लैंगिकतेवर टिप्पणी केली आणि असं वाटलं की मी तुमच्याबरोबर हसेन, तर मी त्यावर हसणार नाही… असं देखील अभिनेता म्हणाला. ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावर आमिर खानचे हे शब्द विनोदाची रेषा कुठे ओढली पाहिजे हे दाखवत आहे.
सांगायचं झालं तर, रणवीर याने शोमध्ये आई – वडिलांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे युट्यूबर वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले असून पोलीस याप्ररकरणी पुढील तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List