महाराष्ट्र सायबर सेलचं युट्यूबला पत्र; ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व एपिसोड हटवले जाणार?
‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमधील युट्यूबर अन् पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने केलेल्या अश्लील वक्तव्याबद्दल सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होत आहे. रणवीर अलाबादियाने याबद्दल सर्वांची माफी मागितली असली तरीही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीये.
काल (10 फेब्रुवारी 2025 ) शोवर मुंबई पोलिसांनीही कारवाई केली आहे. मुंबईतील खार वेस्ट परिसरातील दि हॅबिटेट इमारतीचा पहिला मजल्यावर पोलिसांनी चौकशी केली. इमारतीचे मालक त्याचबरोबर इंडियाज गॉट लैटेंट’ शोचे काही सदस्य कर्मचारी यांचीही चौकशी करण्यात आली.
महाराष्ट्र सायबर सेलनं युट्यूबला पत्र
मात्र आता हे प्रकरण वाढलं असून या शोमधील 30 ते 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नाही तर महाराष्ट्र सायबर सेलनं युट्यूबला पत्र पाठवलं आहे. शोमधली आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्यांना लवकरच नोटीस बजावून चौकशीला बोलवलं जाणार आहे. तसेच शो बंद करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता ‘इंडियाज गॉट लेटेंट’चे सर्व एपिसोड हटवले जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचा संताप
सामान्यांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच या शोवर आणि या शोमध्ये केल्या जाणाऱ्या अश्लील जोक्स, कमेंट्सवर विरोध दर्शवला आहे. त्यात रणवीर अलाहाबादियाने आई-वडिलांच्या नात्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तर सर्वत्रच राग आणि संताप व्यक्त केला जात आहे. रणवीर हा एक नावाजलेला युट्यूबर आणि पॉडकास्टर आहे. मात्र या प्रकरणामुळे रणवीरच्या चांगल्या प्रतिमेलाही तडा गेला आहे.
मात्र रणवीरच नाही तर त्याआधीही या युट्यूब शोमध्ये असे अनेक एपिसोड चर्चेत आले आहेत ज्यात अनेकदा अश्लील आणि वाईट भाषा वापरण्यात आली आहे. मात्र आता रणवीरच्या वक्तव्यामुळे तर शो चांगलाच वादात सापडला आहे. रणवीरसह समय रैनावरही लोक खूप संतापले आहेत.
शोवर बंदी घालण्याची मागणी
रणवीर आणि समय तसेच शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांविरुद्ध मुंबईत आणि नंतर दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली. दिल्लीतील एका वकिलाने तर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोविरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालयात तक्रार दाखल केली आणि शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. एवढंच नाही तर रणवीर अल्लाहबादिया आणि समय रैनाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोलीस पथक
समय रैना आणि इतर क्रिएटर्संविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलीस रणवीर अलाहाबादियाच्या घरी गेले होते. रणवीर अलाहाबादियावर गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्सोवा ठाण्यातील पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. रणवीर अलाहाबादियावर आणि समय रैनावर आता प्रचंड टीका होऊ लागली आहे. त्याचबरोबर मुंबई, महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही त्याच्या गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच या शोला होणाऱ्या विरोधामुळे आणि शो बंद करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता नक्की काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List