अरेच्चा, नवरदेवाचा सिबिल स्कोर कमी म्हणून मोडले लग्न
सिबिल स्कोर खराब असेल तर बँका किंवा पतसंस्था ग्राहकाला कर्ज देत नाहीत. मात्र कमी सिबिलमुळे लग्न मोडल्याची घटना अकोला येथील मूर्तीजापूर येथे घडली.
लग्नाची तारीख व अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी नवरदेव आणि वधूचे कुंटुंबीय जमले होते. त्या वेळी वधूच्या काकाने नवरदेवाची सिबिल स्कोर तपासण्याची मागणी केली. त्याप्रमाणे पॅनकार्डवरून नवरदेवाचा सिबिल स्कोर तपासण्यात आला. तो खूप कमी असल्याचे आढळून आले. मुलाच्या नावावर बरेच कर्ज असल्याचे समजले. त्याने कर्जाची परतफेड केलेली नव्हती, तो थकबाकीदार होता. त्यानंतर मुलीच्या घरच्या मंडळींनी लग्न मोडण्याचे ठरवले. वधूचे काका म्हणाले, नवरदेव आधीच आर्थिक समस्यांनी वेढलेला आहे. तो आपल्या पत्नीला आर्थिक सुरक्षा देऊ शकत नाही. हा मुद्दा मुलीच्या घरच्या अन्य सदस्यांना पटला आणि त्यांनी लग्नास नकार दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List