मर्सिडीजच्या आरोपावर शरद पवार पहिल्यांदाच बोलले, नीलम गोऱ्हेंची कुंडली मांडली; म्हणाले मूर्खपणाचे…
दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला, यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर आता या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेल्या शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
साहित्य संमेलनाला प्रतिसाद चांगला होता. माझ्या अंदाजानं 60 एक हजारांच्या आसपास लोक आले होते. साहित्य संमेलनात काही ना काही वाद होतातच. साहित्य संमेलनाचे इतर कार्यक्रम तालकटोरात झाले. वादाचे स्वरुप गंभीर नव्हते. साहित्य संमेलन यशस्वी झालंय. हे अधिवेशन दिल्लीत दुसऱ्यांदा होतं आहे. पहिलं संमेलन जे झालं त्याचं नेतृत्व नेहरूंकडे होतं. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. यावेळी पंतप्रधान मोंदीवर उद्घाटनाची जबाबदारी होती. स्वागत अध्यक्ष मी होतो.
संजय राऊत यांनी जे सांगितलं ते १०० टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की, नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती, हे माझं मत होतं. हे अधिवेशन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता. त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या. त्यांनी कोणत्या गाडीचा उल्लेख केला. मला वाटतं की राज्याच्या विधीमंडळात येऊन त्यांना चार टर्म झाले असतील. या चार टर्म कशा मिळाल्या महाराष्ट्राला माहीत आहे. त्यांचा सहभाग त्याची चर्चा न केलेली बरी. त्यांची विधीमंडळात एन्ट्री झाली किंवा महाराष्ट्रात झाली ती प्रकाश आंबेडकरांच्या पक्षातून झाली. नंतर त्यांचा काळ राष्ट्रवादीत गेला. नंतर कदाचित त्या काँग्रेसमध्ये होत्या. नंतर त्यांचा काही काळ शिवसेनेते गेला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत गेला. हल्ली त्या शिंदेंच्या संघटनेत काम करत आहेत. मर्यादित काळात त्यांनी दोन चार पक्षाचा अनुभव घेतला आहे. सातत्य होतं की नाही हे माहीत नाही. हा स्वतचा अनुभव लक्षात घेता, त्यांनी असं भाष्य केलं नसतं तर योग्य झालं असतं, असा हल्लाबोल यावेळी शरद पवार यांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List