मराठी अभिनेत्रीने काशीला जाऊन केलं केशदान; व्हिडीओ शेअर करत म्हणाली,”मनातून आवाज आला अन्…”

मराठी अभिनेत्रीने काशीला जाऊन केलं केशदान; व्हिडीओ शेअर करत म्हणाली,”मनातून आवाज आला अन्…”

बॉलिवूडप्रमाणे आता मराठी मालिकांमधल्या अभिनेत्रीही त्यांच्या सर्व अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात. सध्या महाकुंभामध्येही अनेक सेलिब्रिटींनी जाऊन महाकुंभस्नान केलं. त्याचे व्हिडीओ आणि फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण तो महाकुंभाचा नव्हे तर काशीचा.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने केलं केशदान

या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री काशीला गेली असता तिने आपलं केशदान केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे. अचानकपणे व्हिडीओत पाहिल्यानंतर तिला पटकन ओळखता येत नाहीये. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्स केल्या आहेत.

 ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील अभिनेत्रीचा व्हिडीओ

ही अभिनेत्री आहे झी मराठी वरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतील. ही मालिका अंदाजे 21 ऑगस्ट 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. मात्र या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका 14 सप्टेंबर 2024 रोजी बंद झाली. या मालिकेत दक्षता जोइल, खुशबू तावडे, अशोक शिंदे, शर्मिष्ठा राऊत, रुची कदम यांसारख्या अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. त्याचबरोबर या मालिकेत आणखी एक अभिनेत्री होती ती म्हणजे मीनल वैष्णव.

अभिनेत्रीने काशील जाऊन केलं केशदान

मीनल वैष्णवने नुकतीच काशीला गेली होती. तिथे तिने केशदान केलं आहे. त्याचे तिने काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच पोस्ट शेअर करताना तिने अनेक हॅशटॅग दिले आहेत. ज्यातून तिने केशदान करण्याचा निर्णय का घेतला ते काहीसं लक्षात येत आहे. मीनलने #newlife #kashi #sanatan #freedom असे हॅशटॅग दिले आहेत. त्याचबरोबर मीनलने केशदानाचा व्हिडिओ शेअर करत,त्या व्हिडीओवर ‘Answering all the questions (hopefully), Here’s the full #headshave, Yes, I kept #shikha ,No particular reason for this. Just an inner calling असे बरेच कॅप्शन देत तिने तिच्या मनातील भावनांना वाट मोकळी केली आहे.

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या भरभरून कमेंट्स

अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. काहींनी म्हटलं आहे ‘मॅडम, ही खरोखरच एक उत्तम पद्धत आहे, आणि असा खूप कमी महिला विचारात करतात आणि तुम्ही त्यापैकी एक आहात.’ , तर एका युजरनं म्हटलं आहे ,’तुम्ही गुरुदीक्षा घेतली का?’, तर चक्क एकाने म्हटलं की ‘ मॅडम, कोणत्याही एडिटिंगशिवाय पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ अपलोड करा. जेणेकरून इतर मुलींना अशा प्रकारच्या त्यागाची समज होईल.’ अशापद्धतीने नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

शिवसेनेबाबत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे अडचणीत? ठाकरे गटाकडून अशी तयारी, आता थेट… शिवसेनेबाबत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे अडचणीत? ठाकरे गटाकडून अशी तयारी, आता थेट…
UDDHAV THACKERAY ON NEELAM GORHE: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल विधान केले. ठाकरेंच्या शिवसेनेत...
माझं डोकं चालतंय तोपर्यंत तुम्ही…खुर्चीत बसून संपवेन… रामराजे निंबाळकर यांचा कुणाला इशारा?
नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं; राऊतांचं थेट उषा तांबेंना पत्र, केली मोठी मागणी
राज्यातील सर्व आमदारांना छावा चित्रपट दाखणार, कोणी अन् कसे केले नियोजन
“भैया थोडा और तीखा बनाओ”; मोफत मिळालेल्या पाणीपुरीवर श्रद्धा कपूर तुटून पडली
Thane Crime News – शाळकरी मुलींचा सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केला विनयभंग, आरोपीला अटक
तापमान 40 अंशांवर पोहचले; उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याचा अवकाळीचा इशारा