‘इन्फेक्शन समजून दुर्लक्ष केलं, पण…’, कॅन्सरवर हिना खानचं मोठं वक्तव्य, कधी झालं गंभीर आजाराचं निदान?

‘इन्फेक्शन समजून दुर्लक्ष केलं, पण…’, कॅन्सरवर हिना खानचं मोठं वक्तव्य, कधी झालं गंभीर आजाराचं निदान?

Hina Khan: कॅन्सर सारखा गंभीर आजार एक गुप्त शिकारी आहे. व्यक्तीच्या शरीराची हा गंभीर आजार कधी शिकार करेल कळून येत आहे. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये काही संकेत नक्कीच मिळतात. पण लोक काही जास्त नसेल असं म्हणून दुर्लक्ष करतात. अशात पुढे जाऊन त्याचं रुपांतर गंभीर आजारात होतं. WHO च्या एका रिपोर्टनुसार, भारतात ब्रेस्ट कॅन्सरमुळे 2022 मध्ये तब्बल 6,70,000 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा थक्क करणारा आहे. सांगायचं झालं तर, अनेक सेलिब्रिटींनी देखील कॅन्सर सारख्या गंभीर आजाराचा सामना केला आहे. आता टीव्ही अभिनेत्री हिना खान कॅन्सरच्या विळख्यात अडकली आहे.

हिना खान हिने देखील सुरुवातील इन्फेक्शन समजून दुर्लक्ष केलं, पण जेव्हा चाचण्या केल्या केल्या अभिनेत्रीला कॅन्सरचं निदान झालं. नुकताच, फराह खान हिच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना हिनाने मोठं वक्तव्य केलं आहे. हिना खान हिला शूटिंगदरम्यान कॅन्सरची काही लक्षणे दिसू लागली होती, पण त्याची तपासणी करणं तेव्हा अभिनेत्रीला आवश्यक वाटलं नाही.

हिना खान म्हणाली, ‘मला वाटत होतं काही तरी चुकीचं होत आहे. पण शुटिंग सोडून मला तपासणी करायची नव्हती कारण मला असं वाटलं काही गंभीर कारण नसेल… छोटं – मोठं इन्फेक्शन असेल असं मला वाटलं. पण नंतर कळलं की कॅन्सर आहे…’, सर्व टेस्ट केल्यानंतर हिना खान हिला तिसऱ्या टप्प्यातील कॅन्सर असल्याचं निदान झालं.

स्वतःला गंभीर आजाराचं निदान झाल्यानंतर हिना हिने चाहत्यांना देखील एक महत्त्वाचा सल्ला दिला. अभिनेत्री म्हणाली, ‘कोणतंही इन्फेक्शन असेल तर दुर्लक्ष करु नका आणि लवकरच तपासणी करा. ज्यामुळे आजाराचं निदान होईल आणि लवकर उपचार होतील…’ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गंभीर आजाराचा सामना करत असताना देखील हिनाच्या चेहऱ्यावर कायम आनंद दिसतो.

हिना खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे हिना खान हिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये वाढ झाली. त्यानंतर अभिनेत्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं. अभिनेत्रीने बिग बॉसची ट्रॉफी देखील स्वतःच्या नावावर केली आहे.

आता अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! ‘जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी..’, सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय मोठी बातमी! ‘जोपर्यंत संतोष देशमुखांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी..’, सुरेश धसांनी घेतला मोठा निर्णय
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, या घटनेनंतर आता राज्यात वातावरण चांगलंच तापलं...
साहित्य संमेलनातील मर्सिडीज पुराण, राज्यात आले तुफान, ठाकरेंविरोधात जुन्या सहकाऱ्याने पाजळली तलवार
सततच्या ट्रोलिंगबद्दल हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडने सोडलं मौन; म्हणाली “आयुष्यात निराश..”
माप ओलांडताना ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिताचा खास उखाणा; सासरी नवरीचं दणक्यात स्वागत
मराठी अभिनेत्रीने काशीला जाऊन केलं केशदान; व्हिडीओ शेअर करत म्हणाली,”मनातून आवाज आला अन्…”
कपूर कुटुंबातील सर्वात श्रीमंत सून, तिच्याकडे अब्जांची संपत्ती, करीना – रणबीर तिच्यासमोर फेल
डार्क चॉकलेट ह्रदयरोग, मधुमेह, त्वचेसाठी फायदेशीर? जाणून घ्या