आई – वडिलांनी नाही तर, मृत्यूपूर्वी संजूबाबाच्या नावावर कोणी केली 72 कोटींची प्रॉपर्टी? फार कमी लोकांना माहितेय प्रकरण
अभिनेता संजय दत्त याने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्याने आतापर्यंत जवळपास 135 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. संजूबाबाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ज्यामध्ये महिला चाहत्यांची संख्या अधिक आहे. एकदा तर असं झालं, जेव्हा संजूबाबाच्या महिला चाहतीने स्वतःची कोट्यवधींची प्रॉपर्टी संजय दत्त याच्या नावावर केली. संजूबाबाला जेव्हा संपत्तीबद्दल माहिती झालं, तेव्हा अभिनेत्याला देखील मोठा धक्का बसला.
सांगायचं झालं तर, 2018 मध्ये संजय दत्त याला पोलिसांचा फोन आला होता. तेव्हा पोलिसांनी अभिनेत्याली चाहती निशा पाटील यांच्याबद्दल सांगितलं. पण निशा यांच्या निधनाच्या एक दिवसानंतर अभिनेत्याला फोन आला. जेव्हा पोलिसांनी संजूबाबाला सांगितलं की, निशा नावाची तुझ्यासाठी तब्बल 72 कोटींची संपत्ती सोडून गेली आहे.
रिपोर्टनुसार, निशा यांनी बँकेला अनेक पत्र लिहिले होते आणि सर्व प्रॉपर्टी त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीच्या नावावर करण्यास सांगितलं होतं. निशा यांचा आवडता अभिनेता संजूबाबा होता. पण याबद्दल अभिनेत्याला काहीही महिती नव्हतं. संजय दत्त याचा जेव्हा 72 कोटी रुपयांबद्दल कळलं तेव्हा अभिनेता हैराण झाला.
संजय दत्तने चाहतीच्या मालमत्तेवर दावा केलेला नाही
अभिनेत्याच्या वकिलांनी केलेल्या वक्तव्यानुसार, चाहतीच्या 72 कोटींच्या मालमत्तेवर संजय दत्त दावा करणार नाही. कारण निशा कोण आहे? हे देखील संजय दत्तला माहिती नाही. संजूबाबा म्हणाला, ‘मी कशावरही दावा करणार नाही. निशा कोण आहे मी ओळखत नाही आणि या संपूर्ण घटनेबद्दल देखील मला काहीही माहिती नाही…’ असं अभिनेता म्हणाला होता.
संजूबाबाची नेटवर्थ
संजय दत्त याच्याकडे एकून 295 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेता एका सिनेमासाठी तब्बल 8 ते 15 कोटी रुपये घेतो. तो ZimAfro T10 आणि B-Love Candy या क्रिकेट संघांचा सह-मालक देखील आहे. याशिवाय संजयकडे दोन प्रोडक्शन हाऊस होती. अभिनेत्याचा स्वतःचा स्कॉच व्हिस्की ब्रँड, द ग्लेनवॉक आहे. त्यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे झाले तर मुंबईत त्यांचे 40 कोटींचे घर आहे. अभिनेता पत्नी आणि मुलांसोबत आनंदी आणि रॉयल आयुष्य जगत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List