Chhaava सिनेमामुळे ट्रोल होतेय रश्मिका मंदाना, नॅशनल क्रशच्या बचावासाठी दिव्या दत्ताची उडी
Chhaava: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त विकीच्या अभिनयाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. एवढंच नाही तर, नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ‘छावा’ सिनेमाता उल्लेख केला. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमा उत्तम कामगिरी करताना दिसत आहे. सिनेमात विकीने साकारलेल्या भूमिकेचं कौतुक होत आहे, तर दुसरीकडे रश्मीका मंदाना हिला टीकेचा सामना करावा लागत आहे.
सिनेमात रश्मिका हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी येसूबाई भोसले यांची भूमिका साकारली आहे. रश्मिकावर टीका होत असताना अभिनेत्री दिव्या दत्ता हिने नॅशनल क्रशच्या बचावासाठी उडी घेतली आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत दिव्या हिने रश्मिका हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
रश्मिका मंदाना हिच्याबद्दल दिव्या म्हणाली, ‘रश्मिका हिने एकापेक्षा एक सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहे… ही गोष्ट विसरता कामा नये. त्यामुळे प्रेक्षकांचं तिच्यावर असलेलं प्रेम दिसून येत आहे. रश्मिका हिने देखील उत्तम अभिनय केलं.’ असं म्हणत दिव्याने रश्मिकाची बाजू घेतली.
सिनेमात रश्मिकाचं अभिनय पाहून मी प्रभावित झाली आहे… असं देखील दिव्या म्हणाली. पण सिनेमात दिव्या आणि रश्मिका यांचा एकही सिनेमा नाही. एवढंच नाही तर, दिव्या हिने रश्मिकाच्या डोळ्यांचं देखील कौतुक केलं… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त छावा सिनेमाची चर्चा रंगली आहे.
रश्मिका हिच्यासोबतच सर्वांनी आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडली आहे. आता प्रेक्षकांवर निर्भर आहे की, कोण कोणती भूमिका कोणत्या नजरेने पाहत आहे. सिनेमा हीट झालाय आणि हे यश साजरा करायला हवं.. असं देखील अभिनत्री दिव्या दत्ता म्हणाली.
सिनेमात विकी कौशल, रश्मिका मंदाना, दिव्या दत्ता यांच्यासोबत अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि विनीत कुमार यांनी देखील मुख्य भूमिका साकारली आहे. सिनेमाने आतापर्यंत 228 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा 300 कोटींचा आकडा पार करेल असं देखील सांगण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List