सिद्धहस्त लेखक, धुरंधर पत्रकार हरपला

सिद्धहस्त लेखक, धुरंधर पत्रकार हरपला

संयुक्त महाराष्ट्र लढा, सीमाप्रश्नात प्रत्यक्ष मैदानात जाऊन वार्तांकन करणारे ध्येयनिष्ठ पत्रकार, पत्रकारितेसह विविध विषयांवर विपुल लिखाण करणारे, प्रबोधनकार ठाकरे यांचे शिष्य आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर सहकारी, मुंबई आणि गिरणगावावर विशेष प्रेम असणारे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारी काळाचौकी येथील त्यांच्या घरी जाऊन पंढरीनाथ सावंत यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेतेखासदार संजय राऊत, अरविंद सावंत उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्र लढय़ात योगदान 

स्वतंत्र महाराष्ट्र राज्यासाठी उभारलेल्या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढय़ात सावंत मोठय़ा हिरीरीने सहभागी झाले होते. एकजुटीने मराठी माणसांनी उभारलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या जनआंदोलनात पत्रकार म्हणून वेगळी भूमिका न घेता जनआंदोलनाची भूमिका हीच पत्रकाराची भूमिका असते, असे मानत त्यांनी आपली लेखणी चौफेर चालवली, प्रसंगी कार्यकर्ता होत ते आंदोलनात सहभागी होत आणि नंतर घडलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचे वार्तांकन करत. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सीमाप्रश्नी घेतलेल्या सर्व सभांचे त्यांनी वार्तांकन केले.

विपुल लिखाण

पंढरीनाथ सावंत यांनी ‘पत्रकार पंढरी’, ‘टोच्या’ यांसारखी पुस्तके लिहिली तर विपुल अनुवाद लेखनही केले. यात  हिटलर, शेरलॉक होम्स, इंदिरा गांधी यांच्यावरील ‘मदर इंडिया’, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील ‘रिपोर्टिंग इंडिया’चा मराठी अनुवाद विशेष गाजला. त्यांनी विविध विषयांवर 70 पुस्तके लिहिली. 2018 पर्यंत त्यांनी ‘मार्मिक’च्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी सांभाळली.

निर्भीड, व्यासंगी मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड – मुख्यमंत्री

निर्भीडता आणि व्यासंग यांचा मिलाफ असलेले, मराठी पत्रकारितेतील मार्गदर्शक असे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांनी मराठी पत्रकारितेत आपल्या लेखनशैलीने ओळख निर्माण केली.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांना सहवास लाभल्याने त्यांना रोखठोक भूमिका मांडण्याचा वसा मिळाला.

शिवसेनाप्रमुखांचा विश्वासू सहकारी आपण गमावला! – उपमुख्यमंत्री अजित पवार

बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी ही त्यांची ओळख होती. मराठी अस्मितेच्या रक्षणाला त्यांनी प्राधान्य दिले.  त्यांच्या निधनाने बाळासाहेबांचा विश्वासू शिलेदार आपण आज गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

मुंबईच्या इतिहासावर पुस्तक

पंढरीनाथ सावंत यांचे गिरणगाव आणि मुंबईवर विशेष प्रेम होते. त्यांच्या ‘मी पंढरी गिरणगावचा’ यांच्या आत्मचरित्रात याचा वारंवार अनुभव येतो. ते गेल्या काही महिन्यांपासून मुंबईच्या इतिहासावर पुस्तक लिहीत होते. पुस्तकाचे 80 टक्के काम पूर्ण झाले होते, मात्र दुर्दैवाने आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बाळासाहेबांनी केले आत्मचरित्राचे कौतुक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंढरीनाथ सावंत यांच्या आत्मचरित्राबाबत 13 ऑगस्ट 2000 रोजी पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी ‘मी पंढरी गिरणगावचा’ या आत्मचरित्राविषयी कौतुक केले होते. त्यांनी पत्रात म्हटले होते, ‘पंढरी हे पत्रकार-लेखक म्हणून आमच्या घरचं ‘प्रॉडक्ट’ आहे. मुंबईतील कारखान्यात हेल्पर, गणपतीच्या कारखान्यात रंगारी, बेस्ट बसमध्ये पंडक्टर, अंगावर खाकी कपडे घालून चित्रकलेचे शिक्षण आणि म्युनिसिपालिटीच्या उर्दू शाळेत चित्रकला शिक्षक आणि शेवटी पत्रकार असा त्यांचा प्रवास राहिला. हा आत्मचरित्रासाठी चांगला मसाला आहे. त्यांनी जगाचा साक्षीदार म्हणून चरित्र लिहिले असल्याने हा इतिहास झाला. त्यामुळे विसाव्या शतकाचा अर्ध्याहून अधिक भाग हा ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो.’

जीवनगौरव पुरस्कार

कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे पत्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांनी पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल मंत्रालयाच्या माहिती व जनसंपर्प विभागाच्या वतीने ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने त्यांना ‘पृ. पा. सामक जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविले होते.

भगव्या शालीत पार्थिव

पंढरीनाथ सावंत हे कट्टर शिवसेनाप्रेमी होते. त्यांच्या निधनानंतर काळाचौकी येथील दिग्विजय गृहसंपुलात त्यांचे पार्थिवही भगव्या शालीत लपेटून ठेवले होते. यावेळी शिवसेना पदाधिकारी, पत्रकार, कलाकार यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा.. मर्सिडीजवरून राजकारण तापलं! विनायक राऊतांचा गोऱ्हेंवर पलटवार, म्हणाले शपथ घेऊन सांगा..
दिल्लीमध्ये आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनात बोलताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. उद्धव...
नीलम गोऱ्हेंच्या आरोपानंतर वातावरण तापलं, ठाकरे गटाच्या नेत्यानं कुंडलीच मांडली, मागितला 18 मर्सिडीजचा हिशोब
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या..! रेल्वेच्या तिन्हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक, वेळापत्रक काय?
‘बाबू काबूच्या बाहेर असतो, महिन्यातून किमान 20 वेळा तरी…’ ; प्रसिद्ध अभिनेत्रीनेच कास्टिंग काऊचबाबत सगळं सांगितलं
बच्चन कुटुंब आणि ‘या’ अभिनेत्यामध्ये 30 वर्षांपासून कट्टर शत्रूत्व; एकत्र काम न करण्याची घेतली शपथ
‘हा’ एक बदल केला असता तर ‘छावा’मधली ती भूमिका आणखी खुलली असती; तुम्हाला काय वाटतं?
महाकुंभमध्ये डुबकी मारल्यानंतर पवन कल्याण रुग्णालयात दाखल; नदीतील प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित