विविध भाषांमधील नाटकांचा आस्वाद घेण्याची मुंबईकरांना संधी, शंभराव्या नाट्य संमेलनानिमित्त रंगणार विशेष नाट्य महोत्सव
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या शंभराव्या नाटय़ संमेलनानिमित्त नाट्य परिषदेतर्फे प्रथमच विशेष नाटय़ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 20 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत हा नाटय़ महोत्सव रंगणार असून यशवंत नाटय़मंदिर, जयश्री आणि जयंत साळगांवकर प्रायोगिक रंगमंच, अण्णाभाऊ साठे नाटय़गृह येथे या नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
नाटय़ परिषद ही मराठी नाटय़सृष्टीची शिखर संस्था. नाटक, रंगकर्मी आणि प्रेक्षक यांच्यातील सेतू म्हणून काम करत असताना अनेक अभिनव उपक्रम, संकल्पना नाटय़ परिषद सातत्याने राबवते. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत नाटय़ महोत्सवाची माहिती देण्यात आली. यावेळी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, उपाध्यक्ष (उपक्रम) भाऊसाहेब भोईर, प्रमुख कार्यवाह अजित भुरे, कार्यकारिणी सदस्य सविता मालपेकर आदी उपस्थित होते.
या महोत्सवामुळे मुंबईतील कलाकारांना आणि नाटय़रसिकांना वेगवेगळय़ा राज्यातील, प्रांतातील नाटक, त्यांचे सादरीकरण, तिथल्या कलाकारांविषयीच्या गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहे.
या महोत्सकात अक्षरिक (बंगला), बॅरीकेड (हिंदी), ठकीशी संकाद (मराठी), नाडापाकाडई (तामिळ), गरम रोटी (इंग्रजी, तामिळ, हिंदी) अशा दर्जेदार नाटकांचा आस्काद घेता येईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List