दहावीचा पहिलाच पेपर फुटला, कॉपीमुक्त घोषणेचा कचरा; जालन्यातील परीक्षा केंद्रावर अभूतपूर्व गोंधळ, पालकांकडून दगडफेक

दहावीचा पहिलाच पेपर फुटला, कॉपीमुक्त घोषणेचा कचरा; जालन्यातील परीक्षा केंद्रावर अभूतपूर्व गोंधळ, पालकांकडून दगडफेक

कॉपीमुक्त परीक्षा, भरारी पथके, बैठी पथके, फौजदारी गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊनही दहावी परीक्षेच्या मुहूर्तालाच पेपरफुटीचा कलंक लागला. जालनामधील बदनापूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रावर पहिल्या पंधरा मिनिटांतच झेरॉक्स सेंटरवर उत्तरांची कॉपी उपलब्ध झाल्याने एकच खळबळ उडाली. पेपर फुटलाच नाही असा छातीठोक दावा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केला. तर केंद्रप्रमुखांनी पालकांनी दगडफेक करून केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

राज्यात शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला प्रारंभ झाला. बारावीप्रमाणेच ही परीक्षाही कॉपीमुक्त घेण्याची भीष्मप्रतिज्ञा शिक्षण मंडळाने घेतली. त्यासाठी भरारी पथके, बैठी पथके तयार करण्यात आली. कॉपी आढळल्यास केंद्रप्रमुखापासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकीही मंडळाने दिली. मंडळाचे कॉपीमुक्त अभियान दहावीच्या पहिल्याच पेपरला उघडे पडले. बदनापुरात सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद केंद्रावर मराठीचा पेपर सुरू झाला. पेपर सुरू होताच शाळेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या झेरॉक्स सेंटरवर उत्तराची कॉपी मिळत असल्याची बातमी वाऱयासारखी पसरली. त्यामुळे झेरॉक्स सेंटरवर कॉपी पुरवणारांची झुंबड उडाली.

जिल्हा परिषद केंद्रावर पेपर फुटल्याचे कळताच शिक्षण मंडळ, महसूल यंत्रणा, पोलीस खडबडून जागे झाले. शाळेच्या जवळच झेरॉक्स सेंटर चालवणारास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे प्रश्नपत्रिका कोठून आली याची चौकशी सुरू झाली. बदनापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत यांच्यासोबत बैठे, भरारी पथकेही प्रश्नपत्रिका फुटली कशी याचा शोध घेऊ लागले. एवढय़ावरच भागले नाही म्हणून अंबड तालुक्यातील कातखेडा येथील एका तरुणालाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. तहसीलदार, नायब तहसीलदारांसह महसूल प्रशासनाचे अधिकारी केंद्रावर ठाण मांडून बसले.

जिल्हाधिकारी म्हणतात, पेपर फुटलाच नाही

बदनापुरात जिल्हा परिषद केंद्रावर मराठीचा पेपर फुटल्याचे वृत्त धादांत खोटे असल्याचा दावा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केला. झेरॉक्स दुकानदारांनी मराठीच्या प्रश्नपत्रिकेत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे झेरॉक्स काढून विकल्याचे ते म्हणाले. प्रश्नपत्रिका केंद्राच्या बाहेर आलेली नाही. जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत तपासणी करण्यात आली. मात्र दगडफेक करणारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

केंद्रावर कारवाई करणार का?

कोणताही गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्र रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. बदनापुरात परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरफुटीचे लांच्छन लागले. त्यामुळे बोर्ड आता केंद्रप्रमुखावर कोणती कारवाई करणार आणि केंद्र रद्द करण्याचे पाऊल उचलणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

म्हणे, फक्त काही उत्तरांची झेरॉक्स!

फुटलेल्या पेपरची आम्ही छाननी केली. मूळ प्रश्नपत्रिका फुटलेली नाही. फक्त काही प्रश्नांच्या उत्तरांची झेरॉक्स आढळून आली असल्याचा खुलासा शिक्षण मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी केला आहे. प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि त्या प्रश्नांची हस्तलिखित उत्तरे व्हायरल करण्यात आली आहेत. याचा अर्थ पेपर फुटला असा होत नाही, असेही शिक्षण मंडळ म्हणाले.

मंठा तालुक्यातील तळणी येथेही जिल्हा परिषद शाळेच्या बाहेर कॉपी पुरवणाऱयांनी प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनी गर्दीला आवरण्याचा प्रयत्न करताच मोठी हुल्लडबाजी झाली. मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा महाराष्ट्राच्या बसवर हल्ला, काळं फासलं; परिवहन मंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया समोर, कर्नाटक सरकारला कडक इशारा
कर्नाटकात कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या बसवर हल्ला करण्यात आला आहे. बसला काळं...
‘छावा’ मधील ‘येसूबाईं’च्या लूकसाठी खूप मेहनत; रश्मिकाच्या अंगावरील ही साडी तब्बल 500 वर्ष जुनी
Mahakumbh 2025 – प्रयागराजच्या महाकुंभमध्ये उघड्यावर शौच, राष्ट्रीय हरित लवादाचा योगी सरकारला दणका
चिखलीकर-चव्हाण यांच्यातील बेबनाव पुन्हा चर्चेत; चव्हाणांच्या भोकर या बालेकिल्ल्यात चिखलीकरांची टीका
Video – केदारकंठा सर करत शिवरायांना मुजरा! कोल्हापूरच्या 5 वर्षीय अन्वीचा जागतिक विक्रम
वाल्मीक कराडला जेलमध्ये मटण, व्हीआयपी ट्रिटमेंट; सुरेश धस यांचा मोठा दावा
जामिनावर सुटलेल्या आसाराम बापूचे आश्रमात प्रवचन; न्यायालयाच्या आदेशाच्या उल्लंघनाची चर्चा