Gold Price Today – सोन्याच्या दरात 740 रुपयांची वाढ, लवकरच 1 लाखाचा टप्पा गाठणार!
सोने-चांदीच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील करवाढीच्या लढाईमुळे सोन्याचे दर वाढले आहेत. दिवसेंदिवस सोन्याच्या किंमतीत अशीच लक्षणीय वाढ होत राहिली तर लवकरच 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाखांचा टप्पा पार करेल. त्यामुळे सध्या लग्नसराईत दागिने खरेदी करणे देखील महागले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं टॅरिफ ट्रेडचं धोरण, आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततता, आरबीआय आणि रिटेल खरेदीदारांकडून सोने खरेदी वाढल्यानं दर सातत्यानं वाढत आहेत. 29 जानेवारीपासून सोन्याच्या दरात प्रचंड वाढ झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 700 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोन्याचा किंमत 86,430 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे. याआधी सोन्याचा भाव 85,690 रुपये होता. तर 14 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दराने 86,089 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
सोन्यासोबत चांदीच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 967 रुपयांनी वाढून 97, 000 रुपये प्रति किलो झाला आहे. काल चांदीचा भाव प्रति किलो 96,023 रुपये होता.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. त्यांनी आयात शुल्क वाढवण्याचे निर्णय घेतल्यानं सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार होत आहेत. गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्यामध्ये गुतंवणूक होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असून सोन्याने बाजारात उच्चांकी स्थान मिळवले आहे. आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List