मुलीसोबत फोनवर बोलतो म्हणून इन्स्टिट्युटमध्येच विद्यार्थ्यावर चाकूहल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
गुजरातमधील भावनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीसोबत सतत फोनवर बोलायचा म्हणून तिच्या वडिलांना संताप अनावर झाला. यानंतर मुलीचे वडील इन्स्टिट्युटमध्ये दाखल झाले आणि विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक असे जखमी विद्यार्थ्याचे नाव असून तो गुजरातमधील ओज इन्स्टिट्यूटमध्ये शिकतो. कार्तिक एका मुलीसोबत फोनवर बोलत असे. मुलीचे वडील जगदीश रचड यांना ही बाब कळताच त्यांना संताप अनावर झाला. मुलीचे वडील थेट कार्तिक शिकत असलेल्या इन्स्टिट्युटमध्ये दाखल झाले.
रचड हे कार्तिकशी संवाद साधत असतानाच त्यांना राग अनावर झाला. त्यांनी इन्स्टिट्युटच्या काऊन्सिलिंग रूममध्ये शिक्षकाच्या उपस्थितीतच त्यांनी कार्तिकवर हल्ला केला. ही सर्व घटना काऊन्सिलिंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जखमी कार्तिकला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List