सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले कडधान्य करा फस्त!

सकाळी नाश्ता करावा मस्त, मोड आलेले कडधान्य करा फस्त!

आपल्या दिवसाची सुरुवात होते ती सकाळच्या न्याहरीमुळे. नाश्ता हा कसा असायला हवा यावर अनेक चर्विताचर्वण आपण ऐकले आहे. नाश्ता हा इतका उत्तम हवा की, असा नाश्ता केल्यामुळे दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल. शिवाय जो नाश्ता तुम्ही कराल त्याचे शरीरासाठी सुद्धा मुबलक फायदे असतील. म्हणूनच पोटभरीचा नाश्ता हा कायमच बेस्ट पर्याय मानला  जातो.

नाश्ता करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये विविध पर्यायांची निवड केली जाते. सकस नाश्ता असण्याकडे अलीकडे सर्वच भर देऊ लागले आहेत. सकस नाश्ता हा केवळ पोटभरीचा नसतो, तर यामुळे आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप उत्तम फायदे मिळतात. असाच एक सकस आणि सुलभ नाश्ता म्हणजे मोड आलेली कडधान्ये. आपल्या धावपळीच्या युगात अगदी उत्तम असा नाश्ता म्हणून आता मोड आलेल्या कडधान्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मोड आलेले कडधान्य आपण सकाळी नाश्त्यामध्ये का खायला हवेत हे जाणून घेऊया.

मोड आलेले कडधान्य पचनासाठी सर्वात उत्तम मानले जाते. मोड आलेल्या कडधान्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वांचे भांडार असते. मोड आल्यामुळे कडधान्यामध्ये फायबरचे प्रमाण सर्वाधिक असते. फायबर हे पचनशक्ती सुरळीत ठेवण्यासाठी खूप गरजेचे असते.

मोड आलेल्या कडधान्यामध्ये अंकुरीत हरभरे आणि मूग असल्यामुळे केसांच्या वाढीसाठी हे दोन्ही कडधान्य खूप गरजेचे आहेत. ही दोन कडधान्य खाल्ल्यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते आणि केसांचे आरोग्यही सुधारते.

रक्तातील साखर कमी करण्यासाठी सुद्धा मोड आलेले कडधान्य उत्तम पर्याय आहे. मोड आलेल्या कडधान्यामध्ये कार्बोहायड्रेटस् आणि फायबर खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राखली जाते. म्हणूनच मधुमेहींसाठी मोड आलेली कडधान्य खाणे हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

मोड आलेल्या कडधान्याचा वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप फायदा होता. वजन कमी करण्यासाठी शरीरामध्ये फायबर असणे खूप गरजेचे असते. फायबरमुळे पोट खूप काळ भरलेले राहते. म्हणूनच योग्य व्यायाम आणि मोड आलेल्या कडधान्याचे सेवन केल्यास, वजन कमी होण्यास मदत होते.

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका मनपा निवडणुकीची ‘मनसे’ची तयारी, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये वाढणाऱ्या या रुग्णांबाबत राज ठाकरे यांची मोठी भूमिका
MNS Raj Thackeray: राज ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबई मनपा आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत मुंबई शहरातील दोन महत्वाच्या प्रश्नांवर राज...
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी, विकिपीडियाची आता बोबडी वळली, सायबर पोलिसांनी अशी काढली खुमखुमी
मोठी बातमी! ‘तुझे तुकडे तुकडे करू तूला…’, भाजप नेत्याला धमकीचं पत्र
‘छावा’मुळे चर्चेत असलेल्या रश्मिकाकडे कोट्यवधींची प्रॉपर्टी, 5 महागड्या गाड्या, जाणून घ्या नेटवर्थ
प्रियांका चोप्राने एअरपोर्टवर चाहत्यांची माफी का मागितली? नेटकऱ्यांकडून कौतुक
शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज; ‘छावा’मध्ये औरंगजेबाला ठणकावून सांगणारा तो बालकलाकार कोण?
अखेर ‘या’ तारखेला प्राजक्ता अडकणार विवाहबंधनात; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव