Photo – आदित्य ठाकरेंच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिकृतीचे पूजन, रथयात्रेतही सहभागी
जपानमधील ‘आम्ही पुणेकर’ ह्या ग्रुपतर्फे टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारुढ प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्यानिमित्त महाराजांच्या अश्वारुढ प्रतिकृतीची हिंदुस्थानातील नऊ राज्यांमधून शिवस्वराज्य रथयात्रा काढली जात आहे.
ही रथयात्रा आज वरळीमध्ये दाखल झाली. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीचे पूजन करून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे रथयात्रेत सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती टोकियोमध्ये स्थापन होणे आहे, ही माझ्यासह प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List