मोठी अपडेट,रणवीर अलाहाबादिया घरी पोलीस पथक; घराची पाहणी केली अन् …
युट्यूबर अन् पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाने इंडियाज गॉट लेटंटमध्ये केलेल्या अश्लील वक्तव्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. रणवीर अलाबादियाने याबद्दल सर्वांची माफी मागितली असली तरीही हे प्रकरण शांत होताना दिसत नाहीये.
काल (10 फेब्रुवारी 2025 ) शोवर मुंबई पोलिसांनीही कारवाई केली आहे. मुंबईतील खार वेस्ट परिसरातील दि हॅबिटेट इमारतीचा पहिला मजल्यावर पोलिसांनी चौकशी केली. इमारतीचे मालक त्याचबरोबर इंडियाज गॉट लेटेंट’ शोचे काही सदस्य कर्मचारी यांचीही चौकशी करण्यात आली.
रणवीर अलाहाबादियाच्या घरी पोलीस पथक
मात्र आता हे प्रकरण आणखीणच वाढलं आहे. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून रणवीर अलाहबादियाच्या घरी चौकशीसाठी पोलीस पथक पोहोचलं. 5 पोलिस अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतील वर्सोवा येथील युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादिया घरी चौकशीसाठी पोहोचलं. रणवीर अल्लाहबादियाने पालकांवरील अश्लील टिप्पणीवरून आता वाद वाढच चालले पाहायला मिळत आहे. एवढंच नाही तर समय रैनाला देखील चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे.
पोलिसांकडून रणवीरच्या घराची पाहणी
समय रैना आणि इतर क्रिएटर्संविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मंगळवारी मुंबई पोलीस रणवीर अलाहाबादियाच्या घरी गेले होते. रणवीर अलाहाबादियावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वर्सोवा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांनी त्याच्या घराची पाहणी केली. पोलिसांनी सांगितले की,” घराच्या परिसरातील सुरक्षेबद्दल पाहणी करण्यासाठी आम्ही आलो होतो.
आम्हाला येथील परिस्थितीची अपडेट वरिष्ठांना कळवायची असते. इकडे गस्त घालावी लागणार आहे.” असं म्हणत रणवीरच्या घराची पाहणी केली आणि त्याची चौकशीही केली आहे. रणवीर अलाहाबादियावर आणि समय रैनावर आता प्रचंड टीका होऊ लागली आहे. त्याचबरोबर मुंबई, महाराष्ट्रासह इतर ठिकाणीही त्याच्या गुन्हे दाखल झाले आहेत.
समय रैना आणि इतर क्रिएटर्संविरोधात गुन्हा दाखल
रणवीर आणि समय आणि शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांविरुद्ध प्रथम मुंबईत आणि नंतर दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली. दिल्लीतील एका वकिलाने तर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोविरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालयात तक्रार दाखल केली आणि शोवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.
रणवीर आणि समय तसेच शोमध्ये उपस्थित असलेल्या सर्व लोकांविरुद्ध प्रथम मुंबईत आणि नंतर दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिल्लीतील एका वकिलाने तर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोविरुद्ध माहिती आणि प्रसारण मंत्रालयात तक्रार दाखल केली आणि शोवर बंदी घालण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
विधानामुळे प्रतिमेला तडा
खरंतर रणवीर अलाहाबादिया त्याच्या पॉडकास्टमध्ये नेहमी मोटिव्हेशन देणारे, नवनवीन माहिती देणारे विषय निवडतो. त्याचा पॉडकास्ट सर्वांना आवडतोही. अनेक मंत्री आणि नामांकित व्यक्तीच्या मुलाखती त्याने घेतल्या आहेत. पण, या विधानामुळे त्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सोशल मीडियावरही आता त्याला प्रचंड ट्रोल केलं जात आहे, त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. आता रणवीर आणि समयवर काय कारवाई केली जाणार तसेच याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. तसेचहा शो बंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List