Ladki Bahin Yojana : हा तर निवडणुकीपूरता बनाव, लाडक्या बहि‍णींची फसवणूक, महायुती नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, बड्या नेत्याची मोठी मागणी

Ladki Bahin Yojana : हा तर निवडणुकीपूरता बनाव, लाडक्या बहि‍णींची फसवणूक, महायुती नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, बड्या नेत्याची मोठी मागणी

Mukhyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरली. सरसकट सर्वच लाडक्या बहि‍णींच्या खात्यात धडाधड पैसे आले. महायुती सरकार पुन्हा सत्तेत दाखल झाले. त्यानंतर या योजनेवरून गोंधळ सुरू झाला. या योजनेत निकषाचे, नियमाची रेषा आखण्यात आली. पाच लाख महिलांची नावं यादीतून कमी करण्यात आली. त्यावरून विरोधक संतापले आहेत. या बनवेगिरीविरोधात महायुतीच्या नेत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पाच लाख महिलांची नावं वगळली

विधानसभेवेळी तर निकषात न बसलेल्या पाच लाख महिलांच्या खात्यात सुद्धा रक्कम जमा करण्यात आली. आता अपात्र महिलांची छाननी करण्यात आली. त्यात लाभार्थ्यांची संख्या घटली. डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी महिला पात्र होत्या. तो आकडा आता 2.41 कोटींवर आला. सरकारची मोठी रक्कम वाचली.

ही तर मतदारांना लाच

लाडक्या बहि‍णींच्या यादीत कपात झाल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. हे असं होणारच होतं. ते लोकांच्या आता लक्षात आलं आहे. ही विधानसभा निवडणुकीसाठी करदात्यांच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच होती, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री लाडकी बहिणी, आनंदाचा शिधा वा इतर सुरू करण्यात आलेल्या योजना, मतदारांना दिलेली लाच होती आणि ती तेवढ्या काळापुरती होती, असा घणाघात शेट्टी यांनी केला.

हा तर बनाव, गुन्हे दाखल करा

या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक आहे, हे माहिती असताना सुद्धा त्यावेळचे मुख्यमंत्री, मंत्री यांनी विधानसभा निवडणुकीत जनतेची मतं घेण्यासाठी हा बनवा केल्याचा गंभीर आरोप शेट्टी यांनी केला. या फसवणुकीविरोधात महायुतीमधील नेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी जोरदार मागणी राजू शेट्टी यांनी केली. या योजनेतून पाच लाख महिला गायब झाल्या आहेत. अजून किती बहिणी गायब होतील हे समोर येईलच असे ते म्हणाले. एकूणच लाडकी बहीण योजनेतील कारवाईवरून आता नाराजीचा सूर आवळल्या जात असल्याचे समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर माणिकराव कोकाटेंसह एकूण 7 मंत्र्यांचे OSD जाहीर
महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबतचा शासनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह एकूण सात मंत्र्यांचे...
बिग बी प्रेमानंद महाराजांच्या दरबारात; म्हणाले मेरा जीवन सार्थक हो गया, सोशल मीडियात तुफान चर्चा, Video पाहाच
लहान मुलांमध्ये स्टॉमिना वाढवण्यासाठी ‘या’ 5 पदार्थांचा डाएटमध्ये करा समावेश
लहान मुलांना सर्दी खोकल्यासाठी अँटीबायोटिक दिले पाहिजेत का? एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
राज्यात सात अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी
सॅमसंगचे दोन नवीन स्मार्टफोन ‘या’ लॉन्च, मिळणार ८ जीबी रॅम मिळेल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
“या वयात लोकांचं डोकं फिरतं…” गोविंदासोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पत्नी सुनीताचे मोठे विधान