Ratnagiri News – उद्यापासून बारावीची परीक्षा, 61 केंद्रांवर 24 हजार 541 परीक्षार्थी

Ratnagiri News – उद्यापासून बारावीची परीक्षा, 61 केंद्रांवर 24 हजार 541 परीक्षार्थी

बारावीच्या परीक्षेला 11 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. कोकण बोर्डामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी 61 केंद्रांवर 24 हजार 541 परीक्षार्थी बसणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील 38 केंद्रांवर 16 हजार 054 विद्यार्थी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 23 केंद्रांवर 8 हजार 487 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. पहिला पेपर इंग्रजीचा असून सकाळी 11 ते 2 यावेळेत ही परीक्षा होणार आहे.

बारावी परीक्षेच्या काळात कॉपीसारखे गैरप्रकार घडू नयेत याकरीता कोकण बोर्डाने 7 भरारी पथके तैनात ठेवली आहेत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाची भरारी पथकेही पाहणी करणार आहेत. दरम्यान ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून चिपळूण सारख्या संवेदनशील परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयाची नजर राहणार आहे. परीक्षाकेंद्रावर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटासोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सुद्धा पुन्हा...
“लाखो रुपये असेल…”, प्राजक्ता माळीने सांगितला तिचा महिन्याचा खर्च किती?
प्राजक्ता माळीला मोठा झटका; महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध
‘छावा’च्या पुढे नतमस्तक बॉक्स ऑफिस, 200 – 300 कोटी विसरा, जगभरातील कमाई जाणून उंचावतील भुवया
संजीवनी बूटी तर घरीच मिळाली; दिवसातून दोनदा चावा, डॉक्टरला करा दूरूनच रामराम
ट्रिपल एक्सेल ड्रेस निवडताना या गोष्टींचा नक्की विचार करा! तुम्हीही दिसाल मस्त स्लिम
…अखेर एलियाच्या कुटुंबाला शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या परदेशी तरुणाला भावाकडे सोपवले