‘पुष्पा’ चित्रपटामुळे विद्यार्थी बिघडले! हैदराबादमधील शिक्षिकेची शिक्षण आयोगाकडे तक्रार

‘पुष्पा’ चित्रपटामुळे विद्यार्थी बिघडले! हैदराबादमधील शिक्षिकेची शिक्षण आयोगाकडे तक्रार

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटातील अभिनेता आणि अभिनेत्रीचे अनेकांकडून कौतुकही झाले. परंतु, हैदराबादमधील एका शिक्षिकेने या चित्रपटाबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. पुष्पा चित्रपटाचा विद्यार्थ्यांवर वाईट प्रभाव पडला असून पुष्पामुळे विद्यार्थी बिघडले आहेत, असा गंभीर आरोप या शिक्षिकेने केला आहे. ही शिक्षिक एवढ्यावरच थांबली नाही तर तिने शिक्षण आयोगाकडे चित्रपटाबाबत तक्रार सुद्धा केली आहे. शाळेत जेव्हा विद्यार्थी बेजबाबदारपणे वागतात तेव्हा ‘प्रशासक’ म्हणून आपण अपयशी ठरतोय, अशी खंतही या शिक्षिकेने व्यक्त केली आहे. पुष्पा चित्रपटानंतर शाळेतली मुले विचित्र हेअरस्टाइल करत आहेत, ते अश्लील बोलतात. आपण फक्त शिक्षणावर लक्ष केंद्रीत करतोय. विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतोय. ही परिस्थिती केवळ सरकारी शाळांमध्येच नाही तर खासगी शाळांमध्येही आहे. प्रशासक म्हणून मला नेहमी वाटते की मी अपयशी ठरत आहे, असे या शिक्षिकेने म्हटले आहे. विद्यार्थ्यांना शिक्षा केल्याने त्यांच्यावर दबाव येऊ शकतो, असेही या शिक्षिकेचे म्हणणे आहे.

नेटकऱ्यांकडून सावध प्रतिक्रिया
शिक्षिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून मात्र सावध प्रतिक्रिया आल्या आहेत. काही यूजर्संनी शिक्षिकेच्या बाजूने कमेंट केल्या आहेत. तर काहींनी चित्रपटाच्या बाजुने कमेंट केल्या आहेत. चित्रपट पाहून विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ शकतो, असे काही यूजर्सने म्हटले तर तुम्ही काही चांगलं बोलू शकत नसाल तर ठीक आहे. पण किमान आणखी वाईट तरी बोलू नका’, अशी टीका ‘पुष्पा’च्या काही चाहत्याने केलीय. ‘मग गेम चेंजर आणि महर्षीसारखे चित्रपट पाहून विद्यार्थी लगेच आयएएस अधिकारी किंवा शेतकरी बनतील का’, असा उपरोधिक सवालही शिक्षिकेला विचारला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Mahakumbh 2025 भाविकांचे उघड्यावर शौच : प्रदूषण कंट्रोल बोर्ड करणार तपास, हरित लवादाचे आदेश Mahakumbh 2025 भाविकांचे उघड्यावर शौच : प्रदूषण कंट्रोल बोर्ड करणार तपास, हरित लवादाचे आदेश
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला आलेल्या भाविकांना शौचालयाची पुरेशी सोय नसल्याने भाविकांना नाइलाजास्तव उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी)...
आई, गर्लफ्रेंडसह सहा जणांची हत्या करून पोलीस स्टेशनमध्ये आला, पोलिसांना दिली धक्कादायक माहिती
मंत्र्यांचे पीएस, ओएसडी स्वत: फडणवीस ठरवतात, माणिकराव कोकाटे यांचे विधान
सोलापुरात शिवसैनिक आक्रमक; कर्नाटकच्या एसटीवर ‘जय महाराष्ट्र’
संगणक अभियंता मारहाण प्रकरण, कुख्यात गजा मारणे पोलिसांना शरण! मारणे टोळीविरुद्ध ‘मोक्का’
महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी, सांगलीत गारेगाsss र; विक्रेत्याचा उन्हामुळे मृत्यू
54 बेकायदा इमारती तोडायला आलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकाला रोखले! ‘दिवा’ पेटला, पेट्रोलच्या बाटल्या घेऊन शेकडो रहिवाशांचे आंदोलन