राहुल सोलापूरकरला आता कोल्हापुरी चपलेने झोडावं लागेल – जितेंद्र आव्हाड

राहुल सोलापूरकरला आता कोल्हापुरी चपलेने झोडावं लागेल – जितेंद्र आव्हाड

मनूवाद्यांच्या मनातून चातुवर्णाचे भूत कधीही जाणार नाही. जे शिकले. जे ज्ञानी आहेत ते सर्व ब्राम्हण ही त्यांची धारणा आहे. त्यातूनच राहुल सोलापूरकरने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ब्राम्हण केले आहे. त्यामुळेच या राहुल सोलापूरकरला पुण्यातून कसं पळवायचं हे आता जनता ठरवणार आहे. या राहुल सोलापूरकरला आता कोल्हापुरी चपलेने झोडावं लागेल. सोलापूरकर यांच्या दिलगिरी ची आम्हाला गरज नाही त्यांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागावी. पोलीस संरक्षण आज ना उद्या कमी होणारच पोलीस संरक्षण कमी झाल्यावर काय होतं हे कळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तीन मोठी प्रकरणे झाली. एक अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टाने मत नोंदवलं. सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली. संतोष देशमुख यांची हत्या झाली. माझ्या दृष्टीने हे तीन खून आहे. यातील तीन खूनात ज्याने कोणी खून केला आहे, ते कोणीही असो त्यांना ती योग्य ते शिक्षा झाली पाहिजे. परभणी मध्ये कोणीच बोलायला तयार नाही, काही निवडक लोकच परभणी विषयी बोलतात. सोमनाथ सूर्यवंशी माणूस नाही का? त्याला आई नव्हती? पोटचा गोळा हरवल्याने त्याच्या आईला दुःख नसेल. त्या आईने सांगितलं की, तुमच्या सरकारचे दहा लाख रुपये नको माझा मला पोरगा परत द्या. सरकारने कधी गांभीर्याने घेतलं सोमनाथ सूर्यवंशीला? असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तसेच किंबहुना विधानसभेमध्ये उत्तर दिले की तो श्वासो श्वासाच्या त्रासामुळे मेला आहे. खरा सोमनाथ सूर्यवंशी त्याला मारण्यात आलं. तसा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे. तो बेदम मारहाणीत बसलेल्या धक्क्यामुळे मेला असणार. अच्छा कुठे गेला सांगायला तयार नाही. तो मेला आहे, तो कारागृहात मेला आहे. तो पोलीस लॉकअपमध्ये मिळालेला नाही. मग तो कसा मेला? किती वाजता मेला? त्याला औषध कधी दिलं? त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं कधी? कुठली उत्तर सरकार द्यायला तयार नाही, असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, आज जेव्हा मुंबईकडे जी काही कूच होणार आहे, त्यामुळे सरकारने काही उद्योग केले. काहीतरी लिहून दिलेलं आहे. माझ्याकडे पत्र देखील आहे. आज कसं काय सस्पेंड करतात लोकांना? आधी का नाही केलं? अधिकारी गुन्हेगार नव्हते हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलाचा हस्तक हस्तकांचा उपयोग करताय. आम्ही हे प्रकरण दाबून देणार नाही. कोणी केला लाठी चार्ज? कोणी केलं कोंबिंग ऑपरेशन? त्याची काही उत्तर नाही द्यायची, जे आयपीएस ऑफिसर जबाबदार आहे. ज्यांनी लाठीचार्ज चा हुकूम काढला ते दोशी नाही. चार हवालदारांना काढलं तर काम संपल असल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

अक्षय शिंदे मागासवर्गीय त्याला न्याय नाही देणार. कोर्टात त्याच्या आईवडिलांना सांगायला लावतात की, आम्हाला खटला नाही चालवायचा, हे कुठल्या लेवलला चालले आहे. हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवेल लोकांना. गरीबो की जान जान नही होती. आम्ही लढू अक्षय शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख साठी देखील लढू. खून खून आहे. आणि ते कोणाचाही असो. जे कोणी खून करतो त्याला सजा झालीच पाहिजे. तुम्ही शोधा तिथे कोण गेलं होतं? ते एवढे दिवस कुठे गेले होते? आधी का नाही गेले? ते असं कसं बोलू शकतात हे माफ करा. माफ करा अरे वा! हे साधू संतांची अवलाद आहे. खुन्याला माफ करा. सेकंड इयर मध्ये लॉ करणारा विद्यार्थी जातो. आपण माफ करून टाकायचं अरे वा! माफ करा असं कोणी घरातला मेला तर माफ करणार का? बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार न्याय समान असतो, असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा Ladki Bahin Yojana : वेड्या बहिणीची वेडी ही माया, राज्य सरकार मालामाल, हक्कसोड चळवळीने तिजोरीत आला पैसाच पैसा
लाडक्या बहि‍णींनी राज्य सरकारला मालामाल केले. विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या तिजोरीवर ताण आला. भावाच्या खिशावर ताण आल्याचे लक्षात येताच बहिणीचा जीव...
‘छावा’ची स्क्रीप्ट ऐकताच विकी कौशल भावूक झाला, हात जोडून म्हणाला…; लेखकाचा मोठा खुलासा
‘छावा’ पाहिल्यानंतर विश्वास नांगरे पाटील यांची मनाला भिडणारी पोस्ट; ‘हाथी घोडे, तोफ तलवारे..’
रजनीकांत श्रीदेवीच्या प्रेमात अखंड बुडाले होते; ते प्रपोज करणार तेवढ्यात लाईट गेली अन् सगळंच फिसकटलं,काय आहे तो किस्सा
नवरा म्हणाला, तुझे ड्रायव्हरसोबत संबंध म्हणून…, मुलीच्या जन्मानंतर नवऱ्याने सोडली अभिनेत्रीची साथ
त्र्यंबकेश्वर मंदिरात होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाविरोधात पुरातत्त्व विभागाचा इशारा
१४ तास बेशुद्ध, बीपी लो… बिग बींना केले होते मृत घोषित, वाचा नेमकं काय झालं होतं?