महापुरुषांच्या नावाने मतं मागतात, आता या दैवतांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नाही; विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर निशाणा

महापुरुषांच्या नावाने मतं मागतात, आता या दैवतांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नाही; विजय वडेट्टीवार यांचा महायुती सरकारवर निशाणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मतांसाठी विविध योजनांची घोषणा केली. तेव्हा तिजोरीकडे बघितले नाही, आता मात्र एका मागून एक योजना बंद करण्याची तयारी करत आहेत. आता खुर्चीदर्शन झाल्याने मुख्यमंत्री तीर्थदर्शन, आनंदाचा शिधा, शिवभोजन थाळी या योजना बंद करण्याची तयारी करत असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतांसाठी योजनांचा गाजावाजा करत घोषणा केली, तेव्हा तिजोरीकडे बघितलं नाही. आता सत्ता आल्यावर या योजना बंद करत आहे. पैसे नसल्याने लाडकी बहिण योजनेतही अटी शर्ती लागू करून लाभार्थी महिला काही लाखात आणण्याचा सरकारचा घाट आहे. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

भाजप आमदार सुरेश धस यांनी नुकताच परभणी प्रकरणी पोलिसांना माफ करावे, गुन्हे दाखल करू नये, अशी भूमिका घेतली. यावर सुरेश धस यांचा हा दुटप्पीपणा आहे.एका दलित व्यक्तीचा खून होतो,तेव्हा पोलिसांना संरक्षण देण्याची भाजप आमदाराची भाषा ही जातीय द्वेष निर्माण करणारी आहे. कोणीही दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असेही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्याविरोधात सरकार कारवाई का करत नाही? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ आंबेडकर यांची नावं घेत मत मिळवायची, सत्ता आल्यावर आपल्या दैवतांचा अपमान करण्याऱ्यांविरोधात सरकार कारवाई करत नाही. इतिहासकार नसताना कोणाच्या सांगण्यावर सोलापूरकर अशी वक्तव्य करत आहेत, असा सवालही वडेट्टीवार यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटासोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सुद्धा पुन्हा...
“लाखो रुपये असेल…”, प्राजक्ता माळीने सांगितला तिचा महिन्याचा खर्च किती?
प्राजक्ता माळीला मोठा झटका; महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध
‘छावा’च्या पुढे नतमस्तक बॉक्स ऑफिस, 200 – 300 कोटी विसरा, जगभरातील कमाई जाणून उंचावतील भुवया
संजीवनी बूटी तर घरीच मिळाली; दिवसातून दोनदा चावा, डॉक्टरला करा दूरूनच रामराम
ट्रिपल एक्सेल ड्रेस निवडताना या गोष्टींचा नक्की विचार करा! तुम्हीही दिसाल मस्त स्लिम
…अखेर एलियाच्या कुटुंबाला शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या परदेशी तरुणाला भावाकडे सोपवले