गर्मीच्या दिवसांमध्ये सुंदर दिसण्यासाठी करा ‘हा’ सोपा उपाय!! त्वचा होईल फुलासारखी टवटवीत
On
गर्मीच्या दिवसात आपल्या त्वचेचे खूप हाल होतात. खासकरुन चेहरा काळवंडल्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. उन्हाळ्यातील घाम आणि धुळीमुळे चेहरा निस्तेज होतो. यामुळे आपल्या चेहरा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागतो. अशावेळी गर्मीच्या दिवसांमध्ये गुलाबजल हे खूप उपयुक्त मानले जाते. गुलाबजल हे बहुतांशी सर्व घरांमध्ये असते, नसेल तर तुम्ही खासकरुन गर्मीच्या मोसमात हे विकत घेऊन या. त्वचेसाठी गुलाबजलचे फायदे हे अपरिमित आहेत.

आपण जाणून घेऊया त्वचेसाठी गुलाबजल कसे उपयुक्त आहे.
त्वचेसाठी गुलाबजल हे टोनर म्हणून काम करते. त्यामुळे त्वचा हाइड्रेट होण्यास मदत होते.
गुलाबजल फेस पॅकमध्ये कालवून लावल्यास त्वचेला थंडावा मिळतो, तसेच त्वचेला निखार येण्यासही मदत होते.
गुलाबजलामध्ये थोडे पाणी मिसळुन हे पाणी उन्हातून घरी आल्यावर त्वचेवर फवारल्यास त्वचेला तजेला प्राप्त होतो.
कोरफड जेल, गुलाबपाणी फेसपॅक केल्यास हा फेसपॅकही गर्मीत एक उत्तम पर्याय मानला जातो.
मुलतानी माती आणि गुलाबजल हा फेसपॅकही सर्वात उत्तम फेस पॅक मानला जातो.
रात्री झोपण्याआधी गुलाबजल आणि कोरफड जेल फेसपॅक लावल्यास झोपही उत्तम लागते.

निस्तेज त्वचा झाल्यावरही गुलाबजल हा एक रामबाण उपाय आहे. निस्तेज त्वचेला गुलाबजल लावल्यामुळे, त्वचा उजळ होण्यास मदत होते.
गुलाबजलमधील पोषक द्रव्ये ही त्वचेसाठी उपयुक्त आहेत, म्हणूनच फार पूर्वीपासून गुलाबजल हे सौंदर्यसाधनेत वापरले जाते.
गुलाबजल केवळ त्वचेसाठीच नाही तर, केसांसाठी सुद्धा खूप पोषक मानले गेलेले आहे.
त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी सुद्धा गुलाबजल हा बेस्ट पर्याय आहे.
गुलाबजलाचे सौंदर्य आणि शारिरीक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळेच गुलाबजलाची एखादी बाटली ही आपल्या घरात असणे हे केव्हाही उत्तम आहे. येत्या गर्मीला तोंड देताना तुम्हीही घरी एक गुलाबजल बाॅटल आणून ठेवा.
(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
25 Feb 2025 02:03:52
उद्धव ठाकरे यांना एवढ्या मर्सिडीज गाड्यांची आवश्यकता आहे असे वाटत नाही, अशा शब्दात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज नीलम...
Comment List