उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी रोज कलिगंडाची फोड खा, जाणून घ्या कलिंगड खाण्याचे भरमसाठ फायदे!

उन्हाळ्यात फ्रेश राहण्यासाठी रोज कलिगंडाची फोड खा, जाणून घ्या कलिंगड खाण्याचे भरमसाठ फायदे!

उन्हाळ्यामध्ये आपल्याला बाजारामध्ये विविध प्रकारची फळे दिसतात. यातील सर्वात महत्त्वाचे फळ म्हणजे कलिंगड. लालचुटूक कलिंगडाची फोड म्हणजे उन्हाळ्यातील तहानेवरील हमखास आणि फायदेशीर उतारा.. कलिंगड या फळामध्ये असलेले पाण्याचे प्रमाण आपल्याला दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करते. बाजारात एव्हाना आपल्याला कलिंगडाचे ढिग दिसू लागले आहेत. हे पाहून तुम्हालाही कलिंगड खाण्याची इच्छा होणे ही स्वाभिवकच आहे. 
कलिंगड हे लहानांपासून ते मोठ्यांना सर्वांनाच आवडते. कलिंगडाचा ज्यूस ते कलिंगडाचे फ्रूट सलाड अशा नानाविध पद्धतीने आपण कलिंगड खाण्यासाठी वापरू शकतो. आता आपण बघूया गर्मीच्या दिवसांमध्ये कलिंगड खाण्याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे.
 
 
कलिंगडामध्ये लाइकोपिन नावाचा एक घटक आढळतो, हा घटक त्वचेची चमक वाढविण्यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. 
 
कलिंगडामध्ये असलेल्या पाण्याच्या प्रमाणामुळे कलिंगड हे आपल्याला दिवसभर ताजेतवाने आणि हायड्रेट ठेवते. 
 
कलिंगड हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सुद्धा मदत करते. कलिंगडामध्ये मुबलक असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरात होणारी जळजळही कलिंगड खाल्ल्यावर कमी होते. 
 
कलिंगडाच्या सेवनामुळे हृद्याचे आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. कलिंगड उच्च रक्तदाबावरही गुणकारी असल्याचे म्हणूनच मानले जाते. 
 
दातांच्या आरोग्यासाठी कलिंगड हे खूप महत्त्वाचे मानले जाते. कलिंगडामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी मुळे हिरड्यांचे आरोग्यही चांगलेच सुधारते. 
 
पोटांच्या समस्येवर कलिंगड रामबाण उपाय मानला जातो. कलिंगडाच्या सेवनामुळे पोट साफ होण्यासही मदत होते.
 
कलिंगडाच्या फोडीसोबत कलिंगडाची सालही उपयुक्त आहे. कलिंगडाची साल त्वचेला उजाळा देण्याचे महत्त्वाचे कार्य करते.
 
(वरील कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटासोबतच टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’सुद्धा पुन्हा...
“लाखो रुपये असेल…”, प्राजक्ता माळीने सांगितला तिचा महिन्याचा खर्च किती?
प्राजक्ता माळीला मोठा झटका; महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला विरोध
‘छावा’च्या पुढे नतमस्तक बॉक्स ऑफिस, 200 – 300 कोटी विसरा, जगभरातील कमाई जाणून उंचावतील भुवया
संजीवनी बूटी तर घरीच मिळाली; दिवसातून दोनदा चावा, डॉक्टरला करा दूरूनच रामराम
ट्रिपल एक्सेल ड्रेस निवडताना या गोष्टींचा नक्की विचार करा! तुम्हीही दिसाल मस्त स्लिम
…अखेर एलियाच्या कुटुंबाला शोधण्यात कुलाबा पोलिसांना यश, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या परदेशी तरुणाला भावाकडे सोपवले