एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत अमिताभ बच्चन – शत्रुघ्न सिन्हा, ‘या’ अभिनेत्रीमुळे मैत्रीला तडा

एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत अमिताभ बच्चन – शत्रुघ्न सिन्हा, ‘या’ अभिनेत्रीमुळे मैत्रीला तडा

Amitabh Bachchan and Shatrughan Sinha: एक काळ असा होता जेव्हा महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा एकमेकांचे चांगले मित्र होते. इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या मैत्रीची चर्चा रंगलेली असायची. 70 व्या दशकात सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या मैत्रीची चर्चा होती. अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन देखील शेअर केली. दोघांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांची देखील चित्रपटगृहाबाहेर गर्दी जमलेली असायची…

‘दोस्ताना’, ‘नसीब’, ‘यार मेरी जिंदगी’, ‘काला पत्थर’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र काम देखील केलं. पण काही वर्षांनंतर दोघांनी एकत्र काम करणं देखील बंद केलं आणि दोघांच्या मैत्रीला तडा गेलाय याबद्दल सर्वांना कळंल. त्यानंतर कधीच अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा एकत्र सिनेमात किंवा कोणत्या कार्यक्रमात दिसले नाहीत.

‘एनिथिंग बच खमोश’ पुस्तकामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या मैत्रीबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचं नाही म्हणून त्यांनी निर्मात्यांना सायनिंग रक्कम देखील परत करायचे.

सिन्हा म्हणाले होते, अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कामाची ईर्शा वाटू लगली होती. माझ्या कामाचं सर्वच स्तरातून कौतुक होत होतं… हीच एक मोठी अडचण होती. अमिताभ बच्चन यांना सर्वकाही कळत होतं. म्हणून त्यांना देखील माझ्यासोबत काम करायचं नव्हतं.

कोणत्या अभिनेत्रीमुळे मैत्रीला गेला तडा…

पुढे शत्रुघ्न सिन्हा अभिनेत्रीमुळे मैत्रीला तडा गेल्याचं देखील सांगितलं. अभिनेत्री झीनत अमान आणि अभिनेत्री रेखा यांच्यामुळे नात्याला तडा गेल्याचं देखील शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितलं. ‘काला पत्थर सिनेमा दरम्यान एका अभिनेत्रीसोबत त्यांची खास मैत्री झाली होती. ती अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी सेटवर देखील यायची. ‘दोस्ताना’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान देखील असंच झालं होतं.’

‘पण अमिताभ यांनी कधीच त्या मैत्रीला मला भेटवलं नाही. कोण भेटायला यायचं आज प्रत्येकाला माहिती आहे. अशा गोष्टी जगापासून लपून राहतं नाहीत.’ सांगायचं झालं तर, तेव्हा रेखा कायम अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी सेटवर जायच्या…

रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी देखील अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. पण ‘सिलसिला’ सिनेमानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार? मोठी बातमी! धनंजय मुंडे अडचणीत, करुणा शर्मांनी टेन्शन वाढवलं, 15 मार्चला काय होणार?
धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे नुकत्याच झालेल्या विधानसभा...
‘अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’मुळे शाळेतील विद्यार्थी बिघडतायत’; शिक्षिकेची तक्रार
पहिली वेडिंग अॅनिव्हर्सरी, प्रथमेश परब बायकोसह थायलंडला; थेट वाघाच्याच पुढ्यात बसून…
‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर मधुराणी प्रभुलकर दिसणार सिनेमात, स्वत: केला खुलासा
भारत-पाकिस्तान मॅचनंतरच्या ट्विटमुळे जावेद अख्तर ट्रोल; थेट म्हणाले ‘देशप्रेम काय असतं हे..’
‘या’ कारणामुळे ‘हेरा फेरी ३’मधून कार्तिक आर्यन बाहेर; परेश रावल यांचा मोठा खुलासा
‘छावा’च्या समोरही अर्जुन कपूरच्या चित्रपटाचं नशीब जोरावर; करोडोंचा गल्ला