करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे? काय म्हणाले सुरेश धस?

करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे? काय म्हणाले सुरेश धस?

भाजपाचे नेते आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगचे आमदार संतोष देशमुख निर्घृण हत्येचे प्रकरण लावून धरले आहे. या प्रकरणात आकाच्या आकाची राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय आता करुणा मुंडे यांनी देखील राजीनामाची मागणी केली आहे असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. आता आकाच्या पिलावळीचा त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय ठेवलेल्या बऱ्या, त्या बोलणं योग्य होणार नाही, त्यामुळे तपास स्पॉइल होईल असेही भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे.

परभणीवरुन मुंबईला सोमनाथ सुर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात दोषी पोलिसांवर कठोर कारवाई आणि कुटुंबियांना आवश्यक असलेली नुकसान भरपाई देण्याची मागणीसाठी निघालेला मोर्चा रद्द करण्यात आला आहे. नाशिक येथे हा मोर्चा आला त्यास परभणीच्या पालक मंत्री अपर्णा बोर्डीकर यांनी सुर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मोर्चा रद्द करण्याची विनंती केली. या प्रकरणात आपण पहिल्या दिवसांपासून आंदोलकांच्या संपर्कात आहोत. पायी चालणे अत्यंत क्लेशकारक आहे. या प्रकरणात ५ पोलीसांना निलंबित केले आहे. आंदोलकांची १२ पोलीस निलंबित करण्याची मागणी होती. परंतू पोलिसांचं मॉरेल डाऊन होऊ नये म्हणून असे केले नाही. प्रशासनाला दोन्ही बाजूने पाहावं लागतं. यासाठी कारवाई नाही केली. त्यांच्या इतर मागण्यांची पूतर्ता एक महिन्यात व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचा कानावर सर्व घातलंय असे यावेळी सुरेश धस यांनी सांगितले. त्यांना पुन्हा आंदोलन करण्याची वेळच येणार नाही असेही ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

संतोष देशमुख प्रकरणात आकाच्या आकाच्या राजीनाम्याची आमची मागणी कायम आहे. आता करुणा मुंडे यांनीही राजीनाम्याची मागणी केली आहे. करुणा मुंडे यांच्याकडे पंकजा मुंडेंबाबत काय माहिती आहे, हे त्यांनाच विचारावं लागेल. आमच्याकडील सर्व माहिती आम्ही देतो. ती माय माऊली एकटी राहते, मुलं देखील तिच्यासोबत नाही. आता परळीतील ५०० व्यापारी आणि लोकांनी गाव सोडलं आहे. तिथं अनेक माफिया, राख माफिया, वाळू माफिया आहेत. आकाच्या आकाची पिलावळ आहे, त्यांचा सर्व माज आता जिरणार आहे. काही गोष्टी गोपनीय त्या बोलणं योग्य होणार नाही,अन्यथा तपास स्पॉईल होईल, यासाठी आपण धनंजय देशमुखला समजावणार आहोत. कृष्णा आंधळे हा परराज्यात असणार. ते कोकरू आहे, कुठेही गेला तरी तो सापडेल. आमचा पोलीस आणि गृह विभागावर पूर्ण विश्वास आहे असेही सुरेश धस यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या बसेसबाबत महामंडळाचा मोठा निर्णय, काय झाले पाहा  ? कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या बसेसबाबत महामंडळाचा मोठा निर्णय, काय झाले पाहा ?
कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटीला अडवून काही समाजकंटकांनी एसटीच्या चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत...
11 दिवसांत 47 चित्रपट साइन करणारा अभिनेता, ज्याच्या एका चुकीमुळे शाहरुख खान बनला रातोरात स्टार, अभिनेत्याला आजही पश्चाताप
दररोज थोडं थोडं डार्क चॉकलेट खाल्लं तर? फायदे जाणून विश्वास बसणार नाही; लगेचच डाएटमध्ये समावेश कराल
हेच काय गुजरात मॉडेल? राज्यावर 3.77 लाख कोटींचा कर्जाचा बोजा; दरडोई 66 हजारांचा भार
Ratnagiri News – लोटे वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक्समध्ये वायू गळती, एका कामगाराला गॅसची बाधा
Champions Trophy 2025 – इंग्लंडच्या बेन डकेटचा कंगारूंना तडाखा, असा पराक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज
बालासोर येथे रेल्वे दुर्घटना; न्यू जलपैगुडी एक्स्प्रेस रुळावरून घसरली अन् विजेच्या खांबाला धडकली