दहावीच्या निरोप समारंभामध्ये गुरुजींची एक्झिट, विद्यार्थ्यांशी संवाद ठरला अखेरचा
पालघरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दहावीच्या निरोप समारंभावेळी शिक्षकाने जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. संजय लोहार असे मयत शिक्षकाचे नाव आहे. मनोर तालुक्यातील लालबहादूर शास्त्री शाळेत ही घटना घडली.
लालबहादूर शास्त्री शाळेत मंगळवारी दुपारी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आणि मार्गदर्शन करत होते. संजय लोहार हे देखील विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शनपर भाषण करत असताना अचानक पोडियमसह खाली कोसळले.
लोहार यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लोहार यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List