उतार वयात उदित नारायण असंच वागणार! उर्फी जावेदची उदित नारायण यांच्यावर खोचक टिका
गेल्या काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी भर कार्यक्रमात एका महिलेला किस केलं. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही, घडलेल्या घटनेवर उदित नारायण म्हणाले होते की, ” झालेल्या प्रकारामुळे मला लाज का वाटावी? जे घडलं ते वाईट किंवा सीक्रेट नव्हतं. असा खुलासा घडलेल्या घटनेनंतर उदित नारायण यांनी केला होता. घडलं असं होतं की, एका कार्यक्रमादरम्यान एक चाहती सेल्फी काढण्यासाठी त्यांच्याजवळ आली असता, उदित नारायण यांनी तिला किस केलं होतं. अवघ्या काही सेकंदातच उदित नारायण यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
उदित नारायण यांच्या कृत्यावर माॅडेल उर्फी जावेदने चांगलाच निशाणा साधला आहे. उर्फीने इंस्टंट बॉलिवूडशी संवाद साधला तेव्हा ती म्हणाली की, “किस किस को प्यार करूं मैं. किस किस को दिल दूं मैं… यानंतर ती म्हणाली, “पापा कहते हैं… तो पापा ही बडा नाम करेंगे. 69 वर्षाचे आहेत ना ते… आता त्यांचं वयच असं आहे… उतार वयात असंच होतं…” उर्फीच्या या वक्तव्यावर नेटकरीही भलतेच खुश झालेले आहेत. उतार वयात असंच होतं या उर्फीच्या वाक्यावर आता प्रतिक्रियांचा वर्षाव होऊ लागलेला आहे.
उर्फी ही कायम तिच्या पेहरावामुळे चर्चेत राहिलेली आहे. उर्फी ही माध्यमांमध्ये स्पष्ट आणि तिच्या स्टाइलने बोलण्यावरुनही प्रसिद्ध आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List