भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले, स्कूल बस उलटून एका विद्यार्थिनीचा मृत्यू; अनेक जखमी
भरधाव वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कूल बस उलटली. यात एका विद्यार्थिनीची दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जयपूरच्या चौमू जिल्ह्यात ही घटना घडली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी निदर्शने सुरू केली.
अपघातग्रस्त स्कूल बस एका खासगी शाळेची आहे. बसमध्ये एकूण 40 विद्यार्थी होते. बसचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस उलटली. अपघात होताच घटनास्थळावर उपस्थित लोकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले.
नागरिकांनी जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List