छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई, स्फोटकांसह दोन नक्षलवाद्यांना अटक
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन नक्षलवाद्यांना अटक केली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी अटक केलेल्या नक्षलवाद्यांकडून स्फोटकेही जप्त केली आहेत. या नक्षलवाद्यांवर एक लाख रुपयाचे इनाम होते. अखेर त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
सुकमा जिल्ह्यातील केरळपाल परिसरात स्थानिक पोलीस आणि छत्तीसगड सशस्त्र दलाने कारवाई करत मुचाकी देवा (36) आणि मुचाकी जोगा (32) यांना अटक केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. जोगावर एक लाख रुपयाचे बक्षिस होते. तो प्रतिबंधित माओवादी संघटना सीपीआयच्या गोगुंडा पंचायतीअंतर्गत येणाऱ्या चेतना नाट्य मंडलीचा (सीएनएम) कमांडर होता. तर देवा हा त्याचा मिलिशिया सदस्य होता.
अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून 3 किलो वजनाचा आयईडी, दोन डेटोनेटर आणि कॉर्डेक्स वायर जप्त करण्यात आले आहे. या स्फोटकांद्वारे सुरक्षा कर्मचाऱ्यांचा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होते, असे अटक नक्षलवाद्यांनी पोलिसांना सांगितले. दोघांनाही स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List