माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीला एसीबीची नोटीस; जबाबासाठी 11 फेब्रुवारीला हजर राहण्याचे पत्र

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह पत्नीला एसीबीची नोटीस; जबाबासाठी 11 फेब्रुवारीला हजर राहण्याचे पत्र

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्तेप्रकरणी रत्नागिरीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी जबाब नोंदविण्यासाठी माजी आमदार वैभव नाईक व त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी येथे 11 फेब्रुवारी 2025 रोजी उपस्थित राहण्याबाबत पत्र पाठविण्यात आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या पत्रात प्रतिबंधक कार्यालयाकडून सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने 5 डिसेंबर 2022 रोजी आपण पत्नीसह उपस्थित होता. मात्र, लोकप्रतिनिधी कालावधीतील आपली मालमत्ता, उत्त्पन्न व खर्च याबाबत परिपूर्ण माहिती त्यावेळी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. ती माहिती आपण मागाहून सादर करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यावेळी प्राथमिक स्वरुपात आपला जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने मालमत्ता व दायित्वाचे 1 ते 6 फॉर्ममधील माहिती व आवश्यक कागदपत्रांसह अनुक्रमे 3 जानेवारी 2023 रोजी आणि 28 जून 2023 रोजी उपस्थित रहाण्याबाबत आपणास या कार्यालयाकडून कळविण्यात आले होते. मात्र आपण उपस्थित न राहता 28 जून 2023 रोजी आपले अकाउंटंट अमोल केरकर हे उपस्थित राहिले. मात्र, त्यांनी आणलेली कागदपत्रे परिपुर्ण नसल्याने ती न देता, काही कालावधीनंतर आपले उपस्थितीत सदरची कादगपत्रे हजर करु, असे पत्र त्यांनी या कार्यालयास दिले आहे. मात्र, त्यानंतर अद्याप आपल्याकडून कागदपत्रांबाबत पुर्तता झालेली नाही किंवा आपण उपस्थित राहिलेले नाहीत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालयाकडून आपले मालमत्तेच्या सुरु असलेल्या चौकशीप्रकरणी वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा यांचे तसेच HUF व नाईक स्टोन इंडस्ट्रीज यांचे 1 जानेवारी 2002 ते 29 सप्टेंबर 2022 या कालावधीतील उत्पन्न, खर्च व मालमत्ता याबाबतची आवश्यक ती परिपुर्ण माहिती आपणास या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या मत्ता व दायित्वाचे 1 ते 6 फॉर्ममध्ये भरुन तसेच सदर कालावधीतील आयकर विवरणपत्रे, ऑडीट रिपोर्ट, कॉम्प्युटेशन ऑफ इनकम, शेडयुल बॅलन्सशीट, प्रॉफीट अॅन्ड लॉस अकाऊंट डिटेल्स शेडयुल व त्यासंबधीत कागदपत्रांसह 11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी कार्यालय येथे उपस्थित रहावे. असेच पत्र स्नेहा नाईक यांना पाठविण्यात आले असून या जबाब नोंदविण्यासाठी 11फेब्रुवारी रोजी उपस्थित रहावे असे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी म्हटले आहे. अशी नोटीस त्यांनी पाठवण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List