Photo – विराट कोहलीचे इंदोरमधील नवीन रेस्टाॅरंट one8 कम्यूनची झलक..

Photo – विराट कोहलीचे इंदोरमधील नवीन रेस्टाॅरंट one8 कम्यूनची झलक..

हिंदुस्थानातील स्वच्छ शहर म्हणून इंदोरची ओळख सर्वांनाच ज्ञात आहे. तसेच इंदोरची दुसरी हवीहवीशी वाटणारी ओळख म्हणजे इथला सराफा बाजार. सराफा बाजार खाऊगल्ली हे खवैय्यांचे हक्काचे ठिकाण. खवैय्यांच्या याच नगरीत आता क्रिकेटपटू विराट कोहलीचे वन ८ कम्यून हे रेस्टाॅरंट दाखल झाले आहे. हाय स्ट्रीट अपोलोमध्ये स्थित असलेले हे रेस्टाॅरंट म्हणजे खवैय्यांसाठी पर्वणीच आहे.

वन ८ कम्यूनच्या मेन्यूची खासियत म्हणजे इथे अनेक देसी पदार्थांना ग्लोबल टच देण्यात आलेला आहे. इंदूरच्या आवडत्या स्ट्रीट फूडला जलेबी चाट, काला चना हम्मुस चाट आणि दाल पकवान सारख्या पदार्थांना ग्लोबल टच देण्यात आलेले आहे. मेनूमध्ये डिमसम, सुशी आणि इतर अनेक जागतिक पदार्थांचा समावेश आहे.

इंदोरसारख्या शहरामध्ये भटकंती करताना सराफा बाजाराच्या जोडीला आता विराट कोहलीचे वन ८ कम्यून पण खवैय्यांची भूक भागवेल यात शंकाच नाही.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List