काँग्रेसच्या टिळकभवनामध्ये दोन नाना आहेत, एकाने माझ्याकडे ४ कोटी मागितले, कोणी केला धक्कादायक आरोप ?
विधानसभा निवडणूकांनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे नवीमुंबई ऐरोलीतील नेते काँग्रेस नेतृत्वाला दुगाण्या झाडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत. आता या नेत्याने जाता जाता काँग्रेसवर मोठी तोफ डागली आहे. काँग्रेस भवन मध्ये दोन नाना आहेत. त्यापैकी एक नानाने माझ्याकडून चार कोटी रुपयांची लाच मागितली आणि तिकीट देतो म्हणाला या नाना कोण हे तुम्हीच शोधून काढा असा सल्ला त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे.
नवी मुंबईतील काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वावर दुगाण्या झाडल्या आहेत. नवीमुंबईत काँग्रेसला तिकीट मिळू नये म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाशी साठगाठ बांधली होती असा धक्कादायक आरोप रमाकांत म्हात्रे यांनी केला आहे. काँग्रेस भवनमध्ये दोन नाना आहेत.त्यापैकी एका नानाने आपल्याकडे तिकीटांसाठी चार कोटीची मागणी केली होती. काँग्रेस टिळक भवनातील काम करणाऱ्या व्यक्तीने मला सल्ला दिला की एक रुपयाही देऊ नका ? तुम्ही पक्षातील जुने नेते आहात असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे.
सनसनाटी आरोप
काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसपक्षावर गंभीर आरोप करताना म्हटलेय की मला काँग्रेसपक्षाने भरभरून दिलं आहे.काँग्रेसभवनमध्ये 2 नाना आहेत त्यापैकी एकाने विधानसभा निवडणुकीच्यावेळी माझ्याकडे 4 कोटीची मागणी केली होती.टिळक भवनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की तुम्ही 1 रुपया ही देऊ नका तुम्ही एकनिष्ठ आहात.त्यानंतर आपण नागपूरला गेलो असता मला काही वेगळीच माहिती मिळाली. नवी मुंबईत काँग्रेसला एकही तिकीट मिळू नये यासाठी नवी मुंबईतील एका भाजपच्या नेत्याने काँग्रेसला 2 ते 3 कोटी रुपये दिले होते.
म्हणून पक्षाच्या वाट्याला एकही जागा आली नाही असा सनसनाटी आरोप रमांकात म्हात्रे यांनी केला आहे.
ऐरोलीमध्ये पक्ष प्रवेश होणार
नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्ष पदाला स्टे दिला आहे. त्यामुळे आता नाना कोण ते तुम्ही शोधा मी काहीही बोलणार नाही असाही दावा रमाकांत म्हात्रे यांनी केला आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन आले होते. पैसे मागितल्याबद्दल तक्रार करण्यासाठी आपण बाळासाहेब थोरात, आणि विजय वडेट्टीवार यांना 15 दिवसांपूर्वी फोन देखील केले होते, पण त्यांनी फोन उचलले नाहीत.एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला 8 तारखेची वेळ दिलेली आहे आणि त्यावेळी माझ्यासोबत 4 माजी नगरसेवक आणि युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. मोठा पक्षप्रवेश झाला पाहिजे अशी शिंदे साहेबांची इच्छा आहे.शिंदे साहेब आणि मी एकमेकांना खुप वर्षांपासून ओळखतो.हा पक्षप्रवेश नवी मुबंईत ऐरोलीमध्ये पार पडणार असल्याचे रमाकांत म्हात्रे यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List