प्रिती झिंटाने स्टार क्रिकेटर्स, अभिनेत्यांना केलं डेट, अखेर परदेशात थाटला संसार, जगतेय रॉयल आयुष्य

प्रिती झिंटाने स्टार क्रिकेटर्स, अभिनेत्यांना केलं डेट, अखेर परदेशात थाटला संसार, जगतेय रॉयल आयुष्य

Preity Zinta Past Relationship: अभिनेत्री प्रिती झिंता आता परदेशात पती आणि जुळ्या मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा प्रिती झिंटा तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना प्रितीचं नाव अनेक सेलिब्रिटी आणि स्टार क्रिकेटपटूंसोबत जोडण्यात आलं. पण कोणासोबत अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने 28 फेब्रुवारी 2015 जीन गुडइनफशी लग्न केले. तर आज जाणून घेऊ प्रितीचं नाव कोणत्या आणि किती सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं.

रिपोर्टनुसार, प्रिती झिंटाच्या रिलेशनशिपच्या यादीत सर्वात पहिलं नाव अभिनेता अभिषेक बच्चन याचं आहे. ‘कभी अलविदा न कहना’ आणि ‘झूम बराबर झूम’ सिनेमामुळे अभिषेक आणि प्रिती यांच्या नात्याची चर्चा रंगू लागली. पण रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत. असं दोघांनी देखील अनेकदा सांगितलं.

अभिषेक बच्चन याच्यानंतर प्रितीचं नाव ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याच्यासोबत जोडू जाऊ लागलं. पण प्रितीने ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याच्यासोबत असलेल्या नात्याचा कधीच स्वीकार केला नाही. ऑस्ट्रिलियन क्रिकेटर ब्रेट ली याने देखील कधीच प्रितीसोबत असलेल्या नात्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

प्रिती झिंटा आणि अभिनेता-मॉडेल मार्क रॉबिन्सन यांच्यातील नातेही मैत्रीच्या पलीकडच्या होतं… अशी देखील अनेकदा चर्चा रंगली. अफेअरनंतर दोघांच्या ब्रेकअपच्याही चर्चा रंगू लागल्या.

त्यानंतर नेस वाडिया आणि प्रितीच्या लिंकअपच्या खूप चर्चेत होत्या. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते, पण 2009 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

आयपीएल दरम्यान, प्रिती आणि युवराज सिंग यांच्या मैत्रीची देखील तुफान चर्चा रंगली. त्यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील रंगू लागल्या. पण दोघांनी देखील नात्याचा सर्वांसमोर स्वीकार केला नाही. त्यानंतर प्रिती हिच्या नावाची चर्चा अभिनेते आणि निर्माते शेखर कपूर यांच्यासोबत रंगू लागली.

धक्कादायक गोष्ट म्हणजे शेखर कपूर यांच्या पत्नीने प्रिती हिच्यावर संसार मोडल्याचे देखील आरोप केले होते. अनेक सेलिब्रिटींना डेट केल्यानंतर प्रिती हिने परदेशातील उद्योजक जीन गुडइनफ याच्यासोबत लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

जीन गुडइनफ आणि प्रिती झिंटा यांनी 28 फेब्रुवारी 2015 मध्ये अमेरिकेत लग्न केलं. लग्नानंतर 2021 मध्ये अभिनेत्रीने सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांच जगात स्वागत केलं. अभिनेत्री आता मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका धनंजय मुंडे आधुनिक तुकाराम महाराज होऊ शकतात, जितेंद्र आव्हाड यांची खोचक टीका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. त्याबद्दल राज्याचे...
पैसे उरले तर मला द्या… बॉलिवूडमध्येही हवा करणाऱ्या अभिनेत्याचं मराठी इंडस्ट्रीसाठी मोठं काँट्रीब्युशन
कोल्डप्ले सिंगर ख्रिस मार्टिन पोहोचला महाकुंभात; गर्लफ्रेंडसोबत संगमामध्ये डुबकी अन्…
सैफचा लेक इब्राहिमच्या पहिल्या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने चाहत्यांची मनं जिंकली; मात्र खुशी कपूरमुळे नाराजी
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात 5 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद
रत्नागिरीत स्मार्ट मीटर जाळून आंदोलन करणार; माजी खासदार विनायक राऊत यांचा इशारा
Maghi Ganeshotsav – आंजर्ले कड्यावरील श्रीगणपती देवस्थानचा माघी गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा