Dates Benefits: शरीरातील हिमोग्लोबिन वाढवायचंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर
निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये खजूरचा समावेश करा. खजूर खाणे तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खजूर तुम्ही दिवसभरामध्ये कधीची खाऊ शकता. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये अतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात कॅलरीज असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते ज्यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. खजूरमध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात
माहितीनुसार, दररोज सकाळी दोन ते तीन खजूर खाणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. खजूरमध्ये भरपूर फायबर, लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असते ज्याममुळे तुमच्या शरीरामध्ये उर्जा निर्माण होते. हिवाळ्यात मुबलक प्रमाणात खजूरचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात. खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या हाडांचे आरोग्य देखील निरेगी राहाते. वाढत्या वयासोबत हाडे कमकुवत होतात त्यामुळे त्यांचं आरोग्य राखण्यासाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते.
खजूरमध्ये भरपूर प्रमाणात मँगनीज, कॉपर आणि मॅग्नेशियम असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. खजूर खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यासोबतच खजूरमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात ज्यामुळे तुम्हाला पोटासंबंधित समस्या होत नाहीत त्यासोबतच अॅसिडिटीच्या समस्या असल्यास दररोज सकाळी रिकाम्यापोटी खजूर खाणे फायदेशीर ठरेल.
\खजूर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच खजूरमध्ये मॅग्नेशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे उच्च रक्तदाबाच्या समसस्या होऊ शकतात. खजूरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात ज्यामुळे सांधिवाताचा त्रास दूर होतो. साधेवाताच्या रूग्णांसाठी खजूर खाणे अत्यंत फायदेशीर ठरू शकते. अशा लोकांनी दररोज खजूर खाल्ल्यामुळे सांधेदुखीचा त्रास दूर होण्यास मदत करते. ज्या लोकांच्या शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच रक्ताची पातळी कमी असेल तर अशा लोकांनी खजूर खाणे फायदेशीर आहे. अशा लोकांनी खजूर खाल्ल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते त्यासोबतच शरीरातील उर्जा वाढते.
खजूर खाण्याचे दुष्परिणाम:
जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
खजूर जास्त खाल्ल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढते.
खजूर प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅसच्या समस्या होऊ शकतात.
अॅलर्जी असलेल्या लोकांनी खजूरचे सेवन करू नये.
जास्त प्रमाणात खजूर खाल्ल्यामुळे तुम्हाला पिंपल्स सारख्या समस्या होऊ शकतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List