Diabetes Control: हिवाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी आहारात ‘या’ पदार्थांचे सेवन करा, समस्या होतील दूर….

हिवाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. हिवाळ्यात मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजेल. हिवाळ्यामध्ये मधुमेहाच्या रूग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे. हिवाळ्यात शरीर निरोगी ठेवणे हेच एक मोठे आव्हान असते. हिवाळ्यात जास्त प्रमाणात शारिरीक हालचाल होत नाही ज्यामुळे जेवल्यावर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. थंडीमध्ये भरपूर भूक लागते ज्यामुळे तुमचं वजन देखील वाढते.
जास्त प्रमाणात पदार्थांचे सेवन केल्यास तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. योग्य व्यायाम आणि पोषक आहाराचा समावेश केल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये फायबर, प्रोटिन, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स अशा पोषक घटकांचा समावेश केला पाहिजेल. मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त ताजे आणि घरी बनवलेले जावन खावे. त्यासोबतच त्यांच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणात तेलाचा वपर करू नये. तसेच तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांची काळजी नेमकं कशा पद्धतीनं घ्यावी चला जाणून घेऊया.
हिवाळ्यात रक्तातील साखरेची पातळी वाढण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत लोकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवायला हंव. जास्त प्रमाणात फायबरचे सेवन केल्यास आरोग्य निरोगी राहाते त्यासोबतच तुमचं वजन देखील नियंत्रित राहाण्यास मदत होते. फायबरचे ससेवन तुम्ही ओट्स, नाचणी अशा आरोग्यदायी पदार्थांनी करू शकता. फायबरचे तुमच्या आहारामध्ये नियमित सेवन केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाते, तुमचं वजन नियंत्रित राहाते आणि पचन सुधारण्यास मदत होते. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. गाजर, मुळा, पालक, मेथी, ब्रोकोली सारख्या पोषक भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करावा. मधुमेहाच्या रूग्णांनी त्यांच्या आहारात डाळी, अंडी, मासे, चिकन आणि चीज यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.
याशिवाय लोकांनी त्या ऋतूमधील फळेही खावीत. फळांमध्ये पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्सने असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. संत्रा, आवळा, सफरचंद, नाशपाती यांसारखी कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेली फळे खाल्ल्यास तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रूग्णांनी केळी, द्राक्षे, या फळांचे सेवन करू नये. यामुळे तुमच्या आरोग्याला गंभीर परिणाम होऊ शकतो. मधुमेहाच्या रूग्णांनी हिवाळ्यात ग्रीन टी, हर्बल टी किंवा हळदीचे दूध प्यावे. त्याच्या सोवनामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यास आणि शरीरातील उर्जा निर्माण करण्यास मदत होते. याशिवाय मधुमेहाच्या रूग्णांनी कोमट पाणी जास्त प्रमाणात घ्यावे. मधुमेहाच्या रूग्णांनी नियमितपणे ३०-४० मिनिटे चालणे, योगासने किंवा हलका व्यायाम करणे आवश्यक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List