‘मी त्याला पाहिलं अन्…’ रवीनाच्या लेकीच्या क्रश 40 वर्षांचा विवाहित अभिनेता

‘मी त्याला पाहिलं अन्…’ रवीनाच्या लेकीच्या क्रश 40 वर्षांचा विवाहित अभिनेता

रविना टंडनची 19 वर्षीय लेक राशा थडानीची बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री झाली आहे. तिने आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. राशा आणि अमन देवगनने ‘आझाद’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. राशाने तिच्या अभिनय करिअरला देखील सुरुवात केली आहे आणि ती लवकरच इतर कलाकारांसोबत मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसेल अशी अपेक्षा आहे.

राशा थडानीने सांगितला तिचा पहिला क्रश

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राशा अनेक मुलाखतींमध्ये व्यस्त दिसत आहे. काही मुलाखतींमधील काही गोष्टी व्हायरल होत आहेत. त्यातील एक म्हणजे तिने एका मुलाखतीदरम्यान तिच्या क्रशचं नाव सांगितलं आणि सर्वांनाच आश्चर्य वाटलं. राशाने तिच्या पहिल्या क्रशबद्दल मोठा खुलासा केल्यानंतर सोशल मीडियावर चागलीचं चर्चा रंगली आहे.

 ‘मी त्याला पाहिलं आणि….’

राशाने एका मुलाखतीत तिच्या पहिल्या क्रशविषयी सांगितले की, 40 वर्षीय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा तिचा पहिला क्रश आहे. ती म्हणाली, ‘मी त्याला पाहिलं आणि त्याच्या अभिनयाने मला कायमच आकर्षित केलं. सिद्धार्थ मल्होत्रा ने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मध्ये पदार्पण केल्यापासूनच तो माझ्या फेवरेट अभिनेता आहे.’ राशा हे सांगताना खूपच उत्साही दिसत होती आणि तिच्या मनातील भावना तिने अगदी मोकळ्यापणाने मांडल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)


सिद्धार्थ मल्होत्राबद्दल बोलायचं झालं तर तो ​​गेल्या बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. त्याच्या अनेक चित्रपटांनी त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केलंय. त्याने २०२३ मध्ये कियारासोबत लग्न केलं आणि फक्त राशाचं नाही अनेक मुलींचा सिद्धार्थ हा पहिला सेलिब्रिटी क्रश नक्कीच आहे.

अमन देवगननेही सांगितला त्याचा पहिला क्रश

तिच्या या वक्तव्यानंतर, अमन देवगननेही राशाच्या या वक्तव्याला दुजोरा देत म्हटलं ‘सिद्धार्थ मल्होत्रा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्याच्या चित्रपटांनी त्याला चाहत्यांमध्ये एक पॉप्युलर स्टार बनवले आहे.’ त्यानंतर अमनलाही त्याच्या क्रशबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्याने दिया मिर्जाचं नाव सांगितलं.

दरनम्यान आझाद चित्रपटातील राशा आणि अमनच्या  अभिनयाचं खूप कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे तिचं गाणं ‘उई अम्मा’, हे गाणं आणि राशाचा डान्स तसेच तिचे एक्सप्रेशन याबद्दलही प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. तसेच राशाच्या आगामी प्रोजेक्टसचीही चर्चा होताना दिसत आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गुड न्यूज! टेस्ला कंपनीची मुंबईत नोकरभरती!! गुड न्यूज! टेस्ला कंपनीची मुंबईत नोकरभरती!!
अमेरिकेतील श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीची टेस्ला पंपनी मुंबई आणि दिल्लीत नोकरभरती करणार आहे. टेस्ला पंपनीच्या कारची किंमत भरमसाट...
पुणेकरांनो, हा भूखंड घोटाळा हलक्यात घेऊ नका…बिल्डरचे उखळ होणार पांढरे, केवळ एक रुपया चौरस फूट भाडेपट्टी
नावातून फक्त एक शब्द काढल्याने 80 कोटींचे नुकसान, बिरा बिअर मेकर बी9 बेव्हेरजेस प्रायव्हेट लिमिटेडचा बोऱ्या वाजला
30 हजारांत अमर होण्याचे किट, अमेरिकन अब्जाधीश देतोय चिरतरुण राहण्याचा मंत्र
चीनची खोल समुद्रात उडी, समुद्रात ६५६० फूट खाली तयार होतंय स्पेस स्टेशन
मेटा कंपनीचा ह्युमनॉईड रोबोट योतोय, हुबेहूब माणसासारखा रोबोट, घरच्या कामात करणार मदत
एकाच कुटुंबात आयपीएस, आयएएस आणि आयआरएस