वाल्मीक खडा तो वो सरकारसे बडा!! थोडी तरी लाज बाळगा!!! जितेंद्र आव्हाड यांचा महायुती सरकारवर निशाणा

वाल्मीक खडा तो वो सरकारसे बडा!! थोडी तरी लाज बाळगा!!! जितेंद्र आव्हाड यांचा महायुती सरकारवर निशाणा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी प्रमुख आरोपी वाल्मीक कराडला मकोकाअंतर्गत अटक झाली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. तिथे त्याला मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि त्याला देण्यात येणाऱ्या वागणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आव्हाड यांनी म्हटले आहे की, हॉस्पीटलमधून बाहेर काढलेल्या वाल्मीक कराडला आता बीडच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. बंदीवासात त्याच्या दिमतीला सात हवालदार तैनात ठेवलेले आहेत. बीडमधील त्याच्या गँगमधील छोटे – मोठे गुन्हेगार मुद्दामहून स्वतःवर एखादा गुन्हा ओढावून घेतात अन् या गुन्हेगारांची रवानगी बीड मध्यवर्ती कारागृहात होते. बीड कारागृहात ते ‘आपोआप’ वाल्मीक कराडच्या जवळ पोहचतात आणि मग, रात्री मस्त मैफिल रंगत असते. एकंदरीत तो कारागृहात आहे, अशी भावनाच त्याच्या मनात निर्माण होऊ द्यायची नाही, असा निर्णय शासन दरबारी झालेला दिसतो. बाकी महाराष्ट्रात आजपर्यंत असे कधी बघितलेले नाही की, कायद्याने जामीन नाकारलेल्या इसमाला एवढे हवालदार दिमतीला तैनात केले आहेत ! अर्थात, तो वाल्मिक कराड आहे… वाल्मिक खडा तो वो सरकारसे बडा !! थोडी तरी लाज बाळगा !!!, असे आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हिंदुस्थान आणि चीनवर अधिक जकात कर -ट्रम्प हिंदुस्थान आणि चीनवर अधिक जकात कर -ट्रम्प
हिंदुस्थान, चीन आणि ब्राझिलसारख्या देशांच्या मालावर अधिक जकात कर लावणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ज्या यंत्रणेने...
जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयांत स्पेशल वॉर्ड
सुरक्षेसाठी गुगलचे आयडेंटिटी चेक फीचर; चोरांना पासवर्ड माहीत असूनही फोन वापरता येणार नाही…
एका तासात पंतप्रधान मोदींचा योगी आदित्यनाथ यांना दोनदा फोन, कुंभमेळ्यातील परिस्थितीची घेतली माहिती
दिल्ली ते श्रीनगर वंदे भारत सुसाट धावणार; 800 किमी अंतर अवघ्या 13 तासांत पूर्ण होणार
लक्षवेधक – रेल्वेत तब्बल 32 हजार पदांची भरती सुरू
मोनालिसा भोसलेला हिरोईन व्हायचेय!