बाबा सिद्दीकींचे हत्येआधी मोहित कंबोजशी संभाषण, झिशान सिद्दीकीच्या दाव्याने खळबळ
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा व माजी आमदार झिशान सिद्दीकीने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या डायरीत सात बिल्डरांसोबत भाजप नेते मोहित कंबोज यांचे देखील नाव असून हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांचे हत्येआधी मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉट्सअॅपवर संभाषण झाले होते.
बाबा सिद्दीकी प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्या आरोपपत्रात झिशान सिद्दीकी यांचा जबाब असून त्यात त्यांनी पोलिसांसमोर काही धक्कादायक दावे केले आहेत. ‘बाबा सिद्दीकी यांना डायरी लिहण्याची सवय. होती. हत्येच्या काही तास आधी त्यांनी त्या डायरीत भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव लिहलं होतं तसंच हत्येच्या दिवशी त्यांचं मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉट्सअॅपवर संभाषणही झाले होते’, असे झिशान सिद्दीकींना मुंबई पोलिसांना चौकशीवेळी सांगितले.
”वांद्रे परिसरातील अनेक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी माझे वडील काम करत होते. त्यातून त्यांचा मोठ्या बिल्डर्सांसोबत वाद झाला होता. त्यांच्या डायरीत त्यांनी या बिल्डरांची नावे लिहलेली होती. त्या सोबत त्यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांचे देखील नाव लिहलेले होते. ज्या दिवशी त्यांची हत्या झाली त्याच दिवशी त्यांनी मोहित कंबोज यांचे नाव त्या डायरीत लिहलेले होते. त्यांनी मोहित कंबोज यांचे नाव का लिहले ते मला नाही नाही”, असे झिशान यांनी पोलिसांना सांगितलेले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List