दिल्ली ते श्रीनगर वंदे भारत सुसाट धावणार; 800 किमी अंतर अवघ्या 13 तासांत पूर्ण होणार
कश्मीर खोऱ्यातून धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी पूर्ण झाल्यानंतर आता दिल्ली ते श्रीनगर मार्गावर ही रेल्वे धावताना दिसणार आहे. दिल्ली ते श्रीनगर हे अंतर 800 किमी असून सुपरफास्ट वंदे भारतमुळे हा प्रवास केवळ 13 तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मागील आठवडय़ात उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकअंतर्गत वंदे भारत ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. चीनाब नदीवर बांधण्यात आलेल्या सर्वात उंच पुलावरून वंदे भारत सुसाट धावली आहे.
वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यानंतर देश-विदेशातील प्रवाशांना कश्मीरमधील नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे. या ट्रेनचे तिकीट दर किती असतील, तसेच किती थांबे असतील याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List