दोन टक्क्यांचा मराठी माणूस… पनवेलमध्ये मराठी गायकवाड कुटुंबाला परप्रांतीय चेअरमन वसुंधरा शर्मा हिची शिवीगाळ

दोन टक्क्यांचा मराठी माणूस… पनवेलमध्ये मराठी गायकवाड कुटुंबाला परप्रांतीय चेअरमन वसुंधरा शर्मा हिची शिवीगाळ

पनवेलमधील हिरानंदानी सोसायटीत राहणाऱ्या मनोज गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबीयांवरही दडपशाही सुरू आहे. दोन टक्क्यांची मराठी माणसं तुम्ही… तुमची हिरानंदानीमध्ये राहण्याची लायकी नाही अशी मुजोरी सोसायटीची महिला चेअरमन वसुंधरा शर्मा हिने केली आहे. इथून निघून जा असे सांगत शर्मा हिने गायकवाड यांना शिवीगाळ केली.

पनवेलमधील भोकरपाडा भागात हिरानंदानी सोसायटी आहे. या सोसायटीत गायकवाड कुटुंबीय भाडय़ाने राहतात. त्यांचे कॉण्ट्रक्ट संपल्यानंतर ते दुसऱ्या रूमची शोधाशोध करत असल्याने त्यासंदर्भात त्यांनी घरमालकाला कळवले होते. गायकवाड यांच्या कुटुंबात लहान मूल असल्याने घरमालकांनी दुसरे घर मिळेपर्यंत राहण्याची परवानगी दिली होती. मात्र या सोसायटीची महिला चेअरमन वसुंधरा शर्मा हिने गायकवाड यांना दमदाटी करत ही रूम सोडून निघून जा असे सांगत प्रचंड गोंधळ घातला. आम्हाला पाच महिन्यांचे बाळ आहे, आम्ही बाळाला घेऊन कुठे जाऊ? असा सवाल गायकवाड यांच्या पत्नीने केला तेव्हा तुमच्या मराठी माणसांची हिरानंदानीत राहण्याची लायकी नाही अशी मुजोरीही तिने करत गायकवाड यांना शिवीगाळ केली.

इतर मराठी कुटुंबांचाही छळ

हिरानंदानी सोसायटीत राहणाऱ्या इतर मराठी कुटुंबांचाही चेअरमन वसुंधरा शर्मा हिने छळ केल्याच्या तक्रारी समोर आल्या. याचा खडसावून जाब विचारल्यानंतर वसुंधरा शर्मा हिने सर्वांची माफी मागितली आणि यापुढे एकही मराठी कुटुंब किंवा भाडेकरूंना त्रास देणार नाही याची कबुलीही तिने दिली.

– या वादानंतर मनोज गायकवाड यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

किचनमध्ये नियमित लागणारी ही पाने गुणकारी, थायरॉईड, शुगरसह अनेक आजारांवर रामबाण किचनमध्ये नियमित लागणारी ही पाने गुणकारी, थायरॉईड, शुगरसह अनेक आजारांवर रामबाण
कोथिंबीरला आयुर्वेदात एक चमत्कारीक औषधी म्हटले गेले आहे. अनेक आजारांवर ती फायदेशीर आहे. थायरॉईड, शुगर आणि सांधेदुखी यासारख्या समस्यांवर ती...
भाजपने हिंदुत्वाचा बाजार मांडला , कर्जतच्या शिवसेना मेळाव्यात अंबादास दानवे यांची टीका
ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांना टाळे ठोका ! पालकमंत्र्यांचे आदेश
सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, सुप्रिया सुळेंनी ठणकावलं
कारच्या धडकेने रिक्षाचालक ठार , चहाची तलफ जीवावर बेतली
ठाणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर
कामावर गेलेले धनंजय कोकाटे घरी परतलेच नाही