ST दरवाढी विरोधात विठ्ठलवाडी एसटी डेपोमध्ये चक्काजाम, शिवसैनिक आक्रमक
महायुती सरकारने एसटी भाड्यामध्ये 15 टक्क्यांनी वाढ केली. या विरोधात शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. राज्यभरात शिवसेनेने महायुती सरकार विरोधात आंदोलन केले आहे. मंगळवारी कल्याण जवळील विठ्ठलवाडी एसटी डेपो मध्ये शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धडक देत चक्काजाम आंदोलन केले. या दरम्यान कोळशेवाडी पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना ताब्यात घेतले. यावेळी शिवसैनिकांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यातच महायुती सरकार विरोधात ठिय्या आंदोलन केले. महायुती सरकारने एसटी भाडेवाढ मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे ,जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते .
सरकारने एसटीच्या भाड्यामध्ये 15 टक्के वाढ केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने विरोध केला. राज्यभरात महायुती सरकार विरोधात आंदोलन छेडलंय. कल्याण जवळील विठ्ठलवाडी एसटी डेपो मध्ये आज शिवसैनिकांनी चक्काजाम आंदोलन केलं . यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत एसटी भाडेवाडीचा विरोध केला.शिवसैनिकांनी एसटी डेपो परिसर घोषणाबाजी करत दणाणून सोडला होता. राज्यातल्या सरकार एकीकडे लाडके बहीण योजना राबवून लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देत आहे, तर दुसरीकडे महागाई वाढवून ,एसटी भाडेवाढ करत त्यांच्याकडून दाम दुपटीने पैसे वसूल करते असा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी केला. जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील ही भाडेवाढ सहन केली जाणार नाही सरकारच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला तसेच भाडेवाढ मागे घेतले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिलाय. आंदोलनादरम्यान पोलिसांनी शिवसैनिकांना ताब्यात घेतलं यावेळी शिवसैनिकांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे आंदोलन केले .जोपर्यंत भाडेवाढ कमी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील व यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List