दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी अंतिम इशारा, रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ घेणार मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट
कोकण रेल्वेमार्गावरुन धावणारी दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी पॅसेंजरसाठी दि. 29 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ आणि कोकणवासीय मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांची भेट घेणार आहेत. यावेळी या दोन्ही गाड्या सुरू करण्याबाबतची मागणी करुन अंतिम इशारा देण्यात येणार आहे.
मध्यरेल्वेने दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर गाडी रद्द करुन त्यावेळेत दादर-गोरखपूर ही गाडी सुरू केली. दादर-रत्नागिरी गाडी रद्द केल्यामुळे कोकणवासियांवर अन्याय झाला आहे. दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या गाड्या सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली रेल कामगार सेनेचे शिष्टमंडळ आणि कोकणवासीय मध्यरेल्वेच्या महाप्रबंधकांना भेटणार आहेत आणि दादर-रत्नागिरी व दादर-सावंतवाडी या गाड्या सुरु करण्याबाबत पुन्हा मागणी करणार आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List