धक्कादायक! महायुती सरकारचे दिव्यांगांकडे दुर्लक्ष होतंय; खंत व्यक्त करत दिव्यांगाने जीवन संपवले

धक्कादायक! महायुती सरकारचे दिव्यांगांकडे दुर्लक्ष होतंय; खंत व्यक्त करत दिव्यांगाने जीवन संपवले

सत्ताधारी महायुती सरकार दिव्यांगांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाहीत. सरकारचे दिव्यांगाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य होत नाहीत. आतापर्यंत आपण अंपगत्वाशी लढा देत जगलो आहोत. मात्र, आता आपण जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी ऑडिओ क्लिप व्हायरल करत आणि सुसाइड नोट लिहून एका दिव्यांगाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबक कडुबा धोत्रे महाराज (वय 45, रा. नेवपूर ता. कन्नड) असे आत्महत्या केलेल्या दिव्यांगाचे नाव आहे. त्यांनी पैठणच्या नाथसागर जलाशयात उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने सर्व स्तरांतून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.

सत्ताधारी महायुती सरकार दिव्यांगांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करत नाहीत. मी अपंगत्वावर मात करत आतापर्यंत जगलो. मात्र, थोड्याच वेळात मी माझे जीवन संपवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना विनंती आहे की, आता तरी दिव्यांगांच्या मागण्या मान्य करा !” अशी ऑडिओ क्लिप अन् सुसाईट नोट त्र्यंबक कडुबा धोत्रे महाराज या दिव्यांगाने व्हायरल केली. आणि पैठणच्या नाथसागर जलाशयात उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या दिव्यांगांच्या लक्षवेधी आंदोलनात ते सहभागी झाले होते. नंतर त्यांनी 27 जानेवारी रोजी “ग्रामपंचायत नेवपूर जहांगीर” या व्हाटस्अप ग्रुपवर वरील क्लिप व्हायरल केली. नेवपूर जहांगीर (ता. कन्नड) येथील सरपंच मनोज देशमुख व माजी सरपंच भारत आवारे यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर कन्नड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. मोबाईल लोकेशनच्या आधारे कन्नड पोलिसांनी शेवगाव जि. (अहिल्यानगर) गाठले. नंतर शेजारीच असलेल्या जायकवाडी धरणाच्या परिसरात पोहोचले. तेव्हा धरणाच्या भिंतीवर मोबाईल व चप्पल दिसून आली. पैठणचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या सहकार्याने शोध घेतला असता नाथसागर जलाशयात दिव्यांग त्र्यंबक धोत्रे यांचा मृतदेह रात्री आढळून आला. शवचिकीत्सा करुन मंगळवारी मृतदेह त्यांच्या नेवपूर गावी पाठवण्यात आला. यावेळी कन्नड पोलिसांच्या वाहनांसह पैठण पोलिसांचे वाहनही पाठवण्यात आले.

ऑडिओ क्लीप व सुसाईड नोट…
मृत दिव्यांग त्र्यंबक धोत्रे यांनी व्हायरल क्लिप व चिठ्ठीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हटले आहे की, दिव्यांगांना घरकुल मिळाले पाहिजे. कर्जमाफी झाली पाहिजे. आणि दिव्यांगांचे जगणे सुखद झाले पाहिजे. यासाठी मी पहाटे 4 वाजता कडाक्याच्या थंडीत नेवपूर येथून निघालो. सकाळी 7 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या लक्षवेधी आंदोलनात सहभागी झालो. परंतु दिव्यांगांची कोणतीही मागणी महायुती सरकार मान्य करत नाही. दिव्यांगांना संपूर्ण कर्जमाफी होत नाही. घरकुल मिळत नाही. साध्या शौचालयाचेही पैसे मिळत नाहीत. मी स्वतः सततचा पाऊस आणि नापिकीमुळे बॅंकेचे कर्ज फेडू शकत नाही. अपंगत्वावर मात करून आतापर्यंत जगलो. परंतु मी थोड्याच वेळात हे जीवन संपवत आहे. महायुती सरकारने आतातरी दिव्यांगांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा. मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही… तीच माझ्यासाठी श्रध्दांजली ठरेल ! असे भावनिक आवाहन त्यांनी क्लिपद्वारे केले.

दिव्यांग संघटनेचे आवाहन
या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाढे (पैठण) यांनी आवाहन केले आहे की, प्रजासत्ताक दिनी दिव्यांगांच्या लक्षवेधी आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या या संवेदनशील सहकाऱ्याने आत्महत्या केली. आमच्या प्रहार परिवाराला हा मोठा धक्का आहे. दिव्यांगांनो आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबाचा मुलाबाळांचा विचार करा. दिव्यांग हे कमजोर नाहीत. उलट त्यांच्यामध्ये अतिरिक्त ऊर्जा आहे. आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. दिव्यांगांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी बच्चु कडूंच्या नेतृत्वाखाली आपण लढाई लढतच आहोत. या संघर्षात आपण यशस्वी होणार आहोत. कृपया असे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये, असे आवाहन त्यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अमित शाह यांनी ठरवून शिवसेना फोडली, कारण त्यांचे… संजय राऊत यांचा गंभीर आरोप काय? अमित शाह यांनी ठरवून शिवसेना फोडली, कारण त्यांचे… संजय राऊत यांचा गंभीर आरोप काय?
शिवसेना ही अनेकांसाठी धमन्यातील रक्त आहे. अनेक हाडाचे शिवसैनिक, दुफळीने अस्वस्थ आहेत. शिवसेना फुटल्याची सल शिवसैनिकांच्या कायम मनात सलत राहते....
पुढच्या घडामोडी काय घडणार याची आम्हाला कल्पना, संजय राऊत यांचं भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात लग्नसमारंभात चर्चा…संजय राऊत यांनी दिले नेमके उत्तर
Supriya Sule : धनंजय मुंडेंकडून अजित पवारांचे स्वागत, इकडे लाडक्या बहिणीची मोठी मागणी, बीड दौर्‍यात दादा निर्णय घेतील?
हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर राकेश रोशन पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, “जे झालं ते..”
आशा भोसलेंची नात नव्हे, मोहम्मद सिराज Bigg Boss फेम या अभिनेत्रीला करतोय डेट ? वर्षभरापासून…
महाकुंभमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर पूनम पांडे म्हणाली, “माझे सर्व पाप..”