एसटी कर्मचाऱ्यांची सरकारविरोधात निदर्शने
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्या, अशी मागणी करत एसटीच्या विविध विभागीय कार्यालयांसमोर कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेच्या वतीने सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. 4 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसटी कामगारांच्या संघटना प्रतिनिधींबरोबर बैठक झाली होती. या बैठकीत एसटी कामगारांना पगारवाढ देण्याचा निर्णय झाला होता. परंतु, अद्याप पगारवाढ झालेली नाही. या आश्वासनाची फडणवीस यांना आठवण करून देण्यासाठी आज मुंबईसह राज्यभरात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली. मुंबई सेंट्रल येथे सरचिटणीस सुनील निरभवणे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने झाली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List