वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत, अजून किती पुरावे हवेत? अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध उघड झाले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणाबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत, हे स्पष्ट झाले आहे, अजून किती पुरावे हवेत, असा सवालही अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला केला.
धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात वाल्मीक कराडचा मुंडे यांचे कामकाज सांभाळत होते. कराड हे मुंडेंचा उजवा हात आहेत. ते खाद्यांलाखादा लावून काम करत होते. अनेक मालमत्ता दोघांच्या संयुक्त नावावर आहेत. मस्साजोगची जी घटना घडली त्यानंतर वाल्मीक कराड जेवढे दिवस फरार होता. त्या काळात कराडने जिल्ह्यासह महाराष्ट्रातील त्यांच्या मालमत्ता इतरांच्या नावे वळवण्यात आल्या. त्यामुळे तपासाबाबत देशमुख कुटुंबियांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
या प्रकरणात वाल्मीक कराज आणि धनंजय मुंडे यांचा सहभाग दिसत आहे. त्यामुळे आम्ही या घटनेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मात्रस सत्ताधारी अजूनही पुरावे मागत आहेत. धनंजय मुंडे आणि वाल्मीमचे संबंध असल्याचे अनेक पुरावे आहेत. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे एकच आहेत, एवढे त्यांचे संबंध आहेत. अजून सत्ताधाऱ्यांना किती पुरावे हवे, असा सवालही अंबादास दानवे यांनी केला.
सरकार निर्लज्जपणे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी नैतिक जबाबदारी घेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असेही दानवे म्हणाले. धनंजय मुंडे मंत्रिपदावर असल्याने बीड आणि महाराष्ट्रातील जनतेत रोष आहे. ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. विरोधी पक्षही या प्रकरणी आवाज उठवत आहे. त्यांनी याआधी असे अनेक खून पचवले आहेत. मात्र, आता विरोधी पक्ष पहिल्या दिवसापासून याप्रकरणी आवाज उठवत आहे. आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न केले आहेत. आता धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याची जबाबदारी सरकारची आहे, असेही दानवे म्हणाले.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा सरकारने घ्यावा. अशी व्यक्ती राज्यातील मंत्रईपदावर असून नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे, असेही दानवे म्हणाले. बीड जिल्ह्यात पोलीस यंत्रणा असूनही ती नसल्यासारखी परिस्थिती आहे. पोलीस मुक्तपणे काम करू शकत नाहीत. आपण यात जिल्ह्याला बदनाम करत नसून ही सत्य परिस्थिती आहे. पोलिसांनाही मारहाण होत आहे, त्यांनाही धमकावले जात आहे. तयामुळे अधिकारीही या जिल्ह्यात काम करायला तयार नसतात. त्यामुळे यांच्याशी संबंधित अधिकारीच कारभार बघत असून ते यांच्या इच्छेप्रमाणे कामं करतात, हे स्पष्ट झाले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांच्यासोबत पोलीसांची उठबस आहे, याचे व्हिडीओ, फोटो आणि अनेक पुरावे उघड झाले आहेत. पोलिसांनीच संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांना धमक्या दिल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व समोर असताना सरकार फक्त तपासाचे नाटक करत आहे का, असा सावलही त्यांनी उपस्थित केला. सरकारला धनंजय मुंडे यांना पाठिशी घालायचे आहे का? या प्रकरणाशी आणि तपासाशी सरकारचा संबंध नसून त्यांना फक्त धनंजय मुंडे यांना वाचवायचे आहे का, असा सवालही त्यांनी केला.
सामान्य माणासाला 50 हजार रुपये बँकेत ठेवताना अडचणी येतात. मात्र, वाल्मीक कराडची कोट्यवधींची मालमत्ता असताना ईडीचे त्यांच्याकडे कसे लक्ष जात नाही. आता ईडी नेमके काय करत आहे, असा सवालही दानवेही यांनी विचारला. सामान्य माणसाने बँकेत 50 हजार रुपये ठेवले आणि नतंर काढले तरी इन्कमट्रक्सची नोटीस येते. आता ईडी, इन्कमटॅक्स झोपले आहेत का, असा सवालही दानवे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List